पुणे-लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री भीषण आग लागली होती. या परिस्थितीचा आढावा घेण्याकरीता पुणे कॅन्टोमेंटचे अग्निशामक दलाचे अधिक्षक प्रकाश कसबे हे घटनास्थळावर दाखल झाले होते. ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाला जवळपास तीन तास प्रयत्न केल्यानंतर त्यावर नियत्रंण मिळवता आले होते. त्यामुळे अधिक्षक कसबे ह्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घराकडे आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान, पीएमपीच्या एका बसने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
येरवड्यातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाला अपघात
अग्निशामक अधिक्षक प्रकाश कसबे हे फॅशन स्ट्रीट मार्केटमधून आपल्या घराकडे जात होते. दरम्यान, पुणे येथील येरवाड्यातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर समोरुन येणाऱ्या पीएमपीच्या बसने जोरदार धडक दिली. त्यामुळे यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

