पुणे-शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रोड दांडेकर पुलाजवळ फुटला आणि हजारो लोकांची वाताहत झाली …या दुर्दैवी कुटुंबाना ,पालिकेकडे पडून असलेले ,मोकळे फ्लॅट राहायला द्यावेत अशी मागणी आज आज महापलिकेच्या मुख्य सभेत कॉंग्रेस चे गट नेते अरविंद शिंदे यांनी केली .
यावेळी ,त्यांनी भाजपचा उल्लेख न करता ,कालवा समितीचा उल्लेख करून …यांच्या पापाचा घडा भरला ..त्याची प्रचीती कालवा फुटीने यावी अशी हि घटना असल्याचे म्हटले . गणेश विसर्जनाला पाणी सोडले नाही. पावसाळ्यात धरणे भरत असताना , धरणातून किती कधी पाणी सोडणार ते सांगण्यात येत होते . मग १३०० क्युसेस पाणी कालव्यातून गुपचूप का आणि कोणासाठी सोडले ? याची चौकशी या बरोबर होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले .
पहा आणि ऐका यावेळी शिंदे काय म्हणाले त्यांच्याच शब्दात …
पालिकेकडे पडून असलेले मोकळे फ्लॅट ‘त्यांना ‘द्या – अरविंद शिंदे (व्हिडीओ)
Date: