पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ब गटात केडन्स संघाने अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ब गटाच्या लढतीत अर्शिन कुलकर्णी(1-27 व 51धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर केडन्स संघाने अँबिशियस स्पोर्ट्स क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव केला. केडन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अँबिशियस स्पोर्ट्स क्लब संघाने 45 षटकात 7बाद 225धावा केल्या. यात सिद्धांत दोशीने(69धावा) व मल्हार वंजारी(31धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 79 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित हडकेने नाबाद 53 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. केडन्सकडून प्रद्युम्न चव्हाण(3-37), राझीक फल्लाह(2-39), अर्शिन कुलकर्णी(1-27) यांनी सुरेख गोलंदाजी करत अँबिशियस स्पोर्ट्स क्लबला मोठे आव्हान उभारण्यापासून रोखले.
षटकामागे 5.00 सरासरी धावगतीचे आव्हान केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 38.3षटकात 3बाद 227धावा करून पूर्ण केले. सलामीची जोडी अथर्व धर्माधिकारीने 86चेंडूत 11चौकाराच्या मदतीने 83धावा, अर्शिन कुलकर्णीने 63चेंडूत 4चौकार व 1षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या. अथर्व व अर्शिन यांनी पहिल्या गड्यासाठी 126चेंडूत 111 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या हर्षल काटेने(नाबाद 38धावा) व कौशल तांबेने(नाबाद 23धावा) यांनी चौथ्या गड्यासाठी 26 चेंडूत 34 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. अँबिशियस स्पोर्ट्स क्लबकडून मल्हार वंजारीने 34 धावात 2गडी, तर ऋषिकेश बारणेने 33धावात 1 गडी बाद केला. सामन्याचा मानकरी अर्शिन कुलकर्णी ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:गट ब: अँबिशियस स्पोर्ट्स क्लब: 45 षटकात 7बाद 225धावा(सिद्धांत दोशी 69(85,9×4,1×6), रोहित हडके नाबाद 53(41,4×4,3×6), मल्हार वंजारी 31(46,3×4), श्रेयस चव्हाण 17, प्रद्युम्न चव्हाण 3-37, राझीक फल्लाह 2-39, अर्शिन कुलकर्णी 1-27) पराभूत वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 38.3षटकात 3बाद 227धावा(अथर्व धर्माधिकारी 83(86,11×4), अर्शिन कुलकर्णी 51(63,4×4,1×6), हर्षल काटे नाबाद 38(45,4×4), प्रद्युम्न चव्हाण 18(20,3×4), कौशल तांबे नाबाद 23(18,4×4), मल्हार वंजारी 2-34, ऋषिकेश बारणे 1-33);सामनावीर-अर्शिन कुलकर्णी; केडन्स संघ 7 गडी राखून विजयी.

