दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत केडन्स व अँबिशियस क्रिकेट अकादमी यांच्यात विजेतेपदासाठी लढत

Date:

  • दिग्विजय पाटील, सचिन भोसले यांची उत्कृष्ट गोलंदाजी 

पुणे, 29ऑक्टोबर 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत केडन्स क्रिकेट अकादमी व अँबिशियस क्रिकेट अकादमी या संघानी अनुक्रमे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी व डेक्कन जिमखाना या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.  
येवलेवाडीच्या ब्रिलियंट्स स्पोर्ट्स अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत फिरकी गोलंदाज दिग्विजय पाटील(4-28) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केडन्सच्या दिग्विजय पाटील(4-28), शुभम हरपाळे(2-39), आर्य जाधव(2-36), सिद्धेश वरघंटे(2-24)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा 48.5षटकात सर्वबाद 187 धावावर कोसळला. यात शुभम नवले 51, सुरज गोंड 27, किरण मोरे 20, राहुल वारे नाबाद 20, कपिल गायकवाड 19 यांनी धावा केल्या. 187धावांचे आव्हान केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 43.2षटकात 5 गडयांच्या बदल्यात 188धावा करून पूर्ण केले. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे केडन्स संघ 12.2षटकात 3बाद 65धावा असा अडचणीत असताना अथर्व काळेने 42चेंडूत 36धावा व हर्षल काटेने 96चेंडूत 2चौकारासह नाबाद 56 धावा यांनी चौथ्या गड्यासाठी 65चेंडूत 47धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर अथर्व काळे बाद झाल्यावर हर्षलने सिद्धेश वरघंटे(नाबाद 34धावा)च्या साथीत पाचव्या गड्यासाठी 111 चेंडूत 73धावांची भागीदारी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. 
वीरांगना क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत सचिन भोसले(4-37) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 6 गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना केडन्स व अँबिशियस क्रिकेट अकादमी यांच्यात दि.4 नोव्हेंबर रोजी पूना क्लब मैदानावर होणार आहे.   
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 48.5षटकात सर्वबाद 187 धावा(शुभम नवले 51(67,8×4), सुरज गोंड 27(38), किरण मोरे 20, राहुल वारे नाबाद 20, कपिल गायकवाड 19, दिग्विजय पाटील 4-28, शुभम हरपाळे 2-39, आर्य जाधव 2-36, सिद्धेश वरघंटे 2-24) पराभूत वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 43.2षटकात 5बाद 188धावा(हर्षल काटे नाबाद 56(96,2×4), अथर्व काळे 36(42,2×4,1×6), सिद्धेश वरघंटे नाबाद 34(50,3×4,1×6), अथर्व धर्माधिकारी 23(37,3×4), हृषिकेश मोटकर 14, कपिल गायकवाड 2-35, राहुल वारे 1-38);सामनावीर-दिग्विजय पाटील;केडन्स संघ 5 गडी राखून विजयी;
डेक्कन जिमखाना: 48षटकात सर्वबाद 216धावा(अजय बोरुडे 69(91,5×4,3×6), अनिश 54(63,7×4,2×6), हर्ष सांघवी 24, अभिषेक ताटे 15, सचिन भोसले 4-37, रिषभ कारवा 3-21, तनय सांघवी 1-24) पराभूत वि.अँबिशियस क्रिकेट अकादमी: 30.5षटकात 4बाद 222धावा(ऋषिकेश बारणे 68(68,12×4,1×6), ओंकार खाटपे नाबाद  40(36,6×4,1×6), अनिकेत पोरवाल नाबाद 52(41,7×4,2×6), सिद्धांत दोषी 26(20), यश बोरामणी 1-15, धीरज फटांगरे 1-25, सोहम कुमठेकर 1-34);सामनावीर-सचिन भोसले; अँबिशियस क्रिकेट अकादमी संघ 6 गडी राखून विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी...