पुणे – कोरोनामुळे तमाशा कलावंतांवर गेल्या वर्षभरापासून उपासमारीची वेळ आली आहे.कलाकारांची अवस्था पाहून सर्वच मराठी कलावंतांची अस्वस्थता पाहून मनोमन दुःख झाले होते. त्यामुळे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे देखरेख समिती सदस्य अतुल बहुले व फुरसुंगी चे माजी सरपंच आप्पा कसबे यांनी तमाशासम्राज्ञी लोककलावंत मंगलाताई बनसोडे यांची त्याच्या गावी जावून भेट घेतली व कलावंतासाठी मदत म्हणून रोख रक्कम २१ हजार रुपयांची वैयक्तीक पातळीवर मदत केली
त्यावेळी अतुल बहुले यांनी महाराष्ट्रातील लोककला टिकवण्यासाठी व कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाने ही पुढे यावे असे अवाहन केले.
वगनाट्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या तमाशा कलावंतांना आत्ता खरी मदतीची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. या वर्षी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यावर कोरोना महामारीमुळे मर्यादा आल्या आहेत त्यामुळे जयंतीवर होणारा खर्च मदत म्हणून समाजातील गरजू घटकांना करावा असे अवाहन त्यांनी यावेळी केले.तसेच एप्रिल व मे महीन्यामध्ये महाराष्ट्रा मध्ये ज्या- ज्या गावाच्या जत्रा आहेत अशा गावच्या उत्सव कमेट्यांनी या तमाशा कलावंताना जत्रा होवू न होवू सढळ हताने वस्तूरुपी व पैसे रुपी मदत करण्याचे आवाहन केले.
ही कला महाराष्ट्राची पारंपारिक कला आहे. ही कला महाराष्ट्राची ओळख आहे. समाज प्रबोधनाचे साधन आहे. ही कला व कलावंत जीवंत राहावे यासाठी शासनाने मदत करण्याची गरज असल्याचे मत यावेळी अतुल बहुले यांनी माडले. यावेळी वंचित आघाडीचे नेते अतुल बहुले ,फुरसुंगी गावचे माजी सरपंच आप्पा कसबे यांच्या हस्ते मंगलाताई बनसोडे व नितीन बनसोडे यांना आर्थिक साह्यय रोख स्वरूपात देण्यात आले .यावेळी मुक्त पत्रकार विशाल लोखंडे ,विजय भुजबळ उपस्थित होते .

