नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2022
त्रिपुरातील राज्य परिषदेत डॉ. माणिक साहा यांच्या राजीनाम्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने ही जागा भरण्यासाठी त्रिपुरातील राज्य परिषदेची पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची अधिसूचना 05 सप्टेंबर 2022 (सोमवार) रोजी जारी केली जाईल.
- नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 (सोमवार) असेल.
- नामनिर्देशनपत्रांची छाननी 13 सप्टेंबर 2022 (मंगळवार) पर्यंत केली जाईल.
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2022 (गुरुवार) असणार आहे.
- मतदान 22 सप्टेंबर 2022 (गुरुवार) रोजी होईल.
- या साठीचे मतदान सकाळी 09:00 ते दुपारी 04:00 या कालावधीत घेण्यात येईल.
- मतांची मोजणी 22 सप्टेंबर 2022 (गुरुवार) संध्याकाळी 05:00 वाजता होईल.निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याची तारीख 26 सप्टेंबर 2022 (सोमवार) ही असणार आहे.
कोविड-19 ची विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे, केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जारी केलेली प्रसिद्धी पत्रके, दिनांक 02.05.2022 च्या अनुच्छेद 06 मध्ये समाविष्ट आहेत, या संबंधिची माहिती https://eci.gov.in/files/file/14151-schedule-for-bye-election-in-3-assembly-constituencies-of-odisha-kerala-and-uttarakhand%E2%80%93-reg/ जेथे लागू असेल तेथे, सर्व व्यक्तींद्वारे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान या नियमांचे अनुसरण केले जाणे गरजेचे आहे.
त्रिपुराच्या मुख्य सचिव, यांना या पोटनिवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायांबाबतच्या सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे याची खात्री करण्यासाठी राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.