पुणे :
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट आय.एम.ई.डी., प्रो फाऊंड, विलग्रो, टी. आय. ई., आणि पुणे ओपन कॉफी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते. आय.एम.ई.डी. कॅम्पस मध्ये पार पडलेल्या या जॉब फेअर मध्ये नव्यांने उद्योजक झालेल्या 70 कंपन्या (स्टार्ट अप) सहभागी झाल्या होत्या. अशी माहिती डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ व्यवस्थापन शास्त्रशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय.एम.ई.डी.’चे संचालक) यांनी दिली.
राज्यभरातून अनेक विद्यार्थी या जॉब फेअरमध्ये सहभागी झाले होते. सहभागी एम.सी.ए., बी.सी.ए., एम.बी.ए. तसेच बी.बी.ए., बी.सी.ए. आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जॉब फेअर मध्ये स्टार्ट अप कंपन्यांद्वारे थेट भेटण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. या जॉब फेअरला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

