पुणे – काल झालेल्या पावसामुळे पुराचे पाणी आणी मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात घाण पाणी गेल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे तसेच बऱ्याच व्यवसायिकाच्या दुकानात पाणी गेल्याने मालाचे नुकसान झाले आहे. नागरिकांची दिवाळी खराब झाली आहे प्रशासन हतबल झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावर आहे. सरकारला विनंती आहे सदर ठिकाणी पाहणी करून नागरिकांना नुकसान भरपाई म्हणुन मदत करावी. अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे.

दरम्यान त्यांनी सांगितले की,काल झालेल्या अतिवृष्टी मुळे झालेल्या भागाची पाहणी करण्याकरिता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी भेट दिली वपाहणी करून कायम स्वरूपी असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले आहे. नाल्याचे रुंदीकरण तसेच कलव्हर्टचे काम करून पुलाची उंची वाढवून देण्याचे तसेच लक्ष्मी रोड वरील ड्रेनेज लाईन मोठ्या व्यासाची करण्यासाठी आदेश दिले आहेत तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलून पंचनामे करण्यासाठी आदेश दिले आहेत.

