बर्गर किंग इंडियाने हॅक केले टी२० क्रिकेट!

Date:

मुंबई: बर्गर किंग इंडियाने ‘द ग्रेटेस्ट हॅक’ हे एक अतिशय आगळेवेगळे कॅम्पेन सुरु केले आहे, यामध्ये क्रिकेट सामन्यांमधील क्षण हॅक करून ग्राहक जिंकू शकतील आकर्षक ऑफर्स, ज्या बीके ऍपवर रिडीम करता येतील.

सध्या सुरु असलेल्या टी२० मॅचदरम्यान बीके ऍपमार्फत द ग्रेटेस्ट हॅक एआर फिल्टर वापरून ग्राहक आकर्षक ऑफर्स जमा करून बीके ऍपवर त्या रिडीम करून घेऊ शकतील.  सामन्यामध्ये मारण्यात आलेल्या प्रत्येक चौकार, षटकाराच्या वेळी, घेतल्या गेलेल्या प्रत्येक विकेटला, ५०, १००, १५०, २०० किंवा २५० धावा पूर्ण होतील अशा प्रत्येक वेळी, पॉवर प्ले दरम्यान आणि कोणत्याही ओव्हरमध्ये ग्राहक या ऑफर्स जमा करू शकतील.  क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा खेळाडू सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असतात तेव्हा दर्शक देखील खेळाच्या प्रत्येक शॉट, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक क्षणाला टॅप करू शकतात, यासाठी त्यांना त्यांना त्यांच्या स्क्रीनवरील मॅचमधील क्षणांना फक्त स्कॅन करावे लागेल आणि अशातऱ्हेने ते आकर्षक ऑफर्स जिंकू शकतील.  भरपूर सामने, भरपूर रोमांचक प्रसंग आणि भरगच्च ऑफर्स यामुळे यंदाचा टी२० सीझन बर्गर किंगच्या ‘द ग्रेटेस्ट हॅक’च्या साथीने अतिशय रोमहर्षक आणि लाभकारक ठरेल यात काहीच शंका नाही.

जास्तीत जास्त लोकांना या कॅम्पेनची माहिती मिळावी यासाठी एक डिजिटल फिल्म तयार करण्यात आली आहेयामध्ये एक हॅकर क्रिकेटप्रेमींना त्यांचे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले ड्यूज द ग्रेटेस्ट हॅक‘ सोबत मिळवून देत आहे.  सोशल मीडियावर भरपूर प्रसिद्धी करण्यात येणार आहेआयपीएल हॅक करण्याबाबत दर्शकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी आकर्षक पोस्ट्स आणि स्टोरीज दाखवल्या जाणार आहेत.  युट्युबफेसबुकइंस्टाग्राम आणि इतर सर्व संबंधित प्लॅटफॉर्म्सवर टी२० च्या संपूर्ण सीझनभर ब्रँड या जाहिराती दाखवणार आहे.  चला तर मगहॅकिंगसाठी सज्ज व्हा!

कॅम्पेनबाबत बर्गर किंग इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री. कपिल ग्रोव्हर यांनी सांगितलेआधुनिक संस्कृतीचा पुरस्कार करणारा ब्रँड ही बर्गर किंगची ओळख आहे. या कॅम्पेनमार्फत आम्ही सध्याची सर्वात जास्त पाहिली आणि चर्चिली जाणारी घटना म्हणजेच टी२० टूर्नामेंट हॅक करत आहोत.  दर्शकांना प्रकाशझोतात आणून क्रिकेटचे जबरदस्त फॅन्स असल्याबद्दलचे बक्षीस त्यांना मिळवून देणे ही या कॅम्पेनची मुख्य संकल्पना आहे.  द ग्रेटेस्ट हॅकमध्ये आमचे सर्व पाहुणेऑगमेंटेड रियॅलिटीमार्फत गेमिफिकेशनआकर्षक ऑफर्समार्फत स्वादिष्ट खाणे आणि बीके ऍप हे सर्व एकत्र येणार आहे.  आम्हाला पक्की खात्री आहे कीयंदाच्या क्रिकेटच्या सीझनमध्ये आमच्या पाहुण्यांना जबरदस्त मजा अनुभवायला मिळणार आहे.”  

झू मीडिया आणि फॉक्सीमोरोनचे सह-संस्थापक श्री. प्रतीक गुप्ता यांनी सांगितले, “आयपीएल इतक्या प्रचंड प्रमाणात यशस्वी होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे दर्शकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद हे आहे.  आज बहुतांश ब्रँड्स क्रिकेटर्सवर भर देतात तर आम्ही दर्शकांच्या भावभावनांवर भर दिला आणि एका अनोख्या समावेशक अनुभवासह ब्रँडविषयी प्रेम निर्माण त्याचा वापर केला आहे. नेटवर्कमधील नैपुण्ये वापरून क्रिएटिव्हटेकव्हिडिओ आणि मीडिया यांच्यातून या कॅम्पेनचे सर्व पैलू तयार करण्यात आले आहे ही झूमध्ये आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.”

ही संकल्पना फॉक्सीमोरोनची असून व्हिडिओची निर्मिती द रॅबिट हॉल आणि एआर फिल्टर बाय फॉस्फेन यांनी केली आहे.  या तीनही एजन्सीज झू मीडिया नेटवर्कचा भाग आहेत.

भारतामध्ये बर्गर किंग® ब्रँडच्या वाटचालीबद्दल:

बर्गर किंग इंडिया लिमिटेड हे भारतात बर्गर किंग®चे मास्टर फ्रॅन्चायजी आहेत.  देशभरात बर्गर किंग®ची रेस्टोरंट्स ही कंपनी चालवते.  बर्गर किंग इंडियाने आपले पहिले रेस्टोरंट भारतात २०१४ साली सुरु केले आणि आता देशभरात त्यांची २५० पेक्षा रेस्टोरंट्स आहेत.  नुकतेच या ब्रॅंडने स्वतःचे बर्गर किंग इंडिया ऍप हे ऑर्डरिंग ऍप सुरु केले असून यामध्ये युजर्सना आकर्षक ऑफर्सविशेष डील्स आणि लॉयल्टी रिवॉर्ड्स देखील दिले जातात.  ही कंपनी दिल्ली एनसीआरपंजाबराजस्थानमुंबईनाशिकपुणेबंगलोरचेन्नईहैद्राबादकेरळगुजरातडेहराडूनउत्तर प्रदेशभोपाळग्वालियर आणि भुबनेश्वर इत्यादी ठिकाणी अनेक रेस्टोरंट्स चालवते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...

प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याचे वृत्त बदमाशीचे ..खोडसाळ

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप...