मालकांची दादागिरी आता संपणार-भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार

Date:

मुंबई:
सेस इमारतीतील पुनर्विकासाला वर्षानुवर्षे वर्षात खीळ पडली होती. त्या समस्येतून दूर करण्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. राष्ट्रपती यांचे अनुमती मिळवून नवीन कायदा आला. मुंबईकरांच्या दिवाळीचा सण व्हावा असा हा निर्णय आहे. संक्रमण शिबिराची अवस्था वाईट होत्या. राहतो तिथेच सोय होणार. आता सर्व जबाबदरी सरकार घेणार आहे. कालमर्यादा स्पष्ट झाली आहे. भाडेकरू आणि विक्री घटकातून मालकांना हिस्सा मिळणार आहे. मालकांची दादागिरी आता संपणार आहे. सेस इमारतीतील मालकांची दादागिरी आता संपली. भाडेकरूच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा केला. मुंबईकरांचा आणि विशेषत: भाडेकरूनचा दिवाळीचा दिवस असावा असा निर्णय झालेला आहे. अशी प्रतिक्रीया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज येथे दिली.


कर्नाटकने आरे केले तर आम्ही ही कारेने उत्तर देऊ
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूने तणावाचे होऊ नये अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचा पहिला अधिकार त्या गावांवर आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात त्यावर भूमिका स्पष्ट आहे. शिंदे सरकार त्या भागामध्ये अनेक योजना पोहोचवणार आहे. जत भागात पाण्याच्या संदर्भातील योजना पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रश्न सामंजस्याने सुटला पाहिजे. कुणी अरे केले तर आम्ही कारे करू. आमचा प्रयत्न कोर्टात भूमिका मांडतो आहे. कर्नाटकच्या बाजूने कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणा झाल्यास आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून त्याला उत्तर देऊ..कुणालाही कुठेही जाण्याची परवानगी आहे महाराष्ट्रातील मंत्री तिथे जाणार असतील तर त्यांना कोणी थांबवू शकणार नाही.
उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री या प्रश्नावर उत्तर देताना- उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे हे मोजण्यासाठी मी एवढा मनकवडा नाही. मला मा. उद्धव ठाकरे यांची घोषणा माहित आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे त्यावरुन तुम्ही काय समजायचे ते समजा.

काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रदेशाध्यक्ष डोक्यावर पडले आहेत का?
महाविकास आघाडीला त्यावेळी आम्ही प्रश्न विचारला होता. तेव्हा नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होते. तत्कालीन प्रश्नावर आजही ठाम आहे. त्यावेळी उद्धवजी नी त्यांना क्लीन चिट का दिली? डोक्यावर पडल्यासारखे काँग्रेसने प्रश्न विचारू नये
जुन्या व्हिडिओ क्लिपवर प्रश्न विचारायचे असतील तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कुठल्या भागाला लकवा लागला होता याचाही व्हिडिओ काढेन मी,काँग्रेसने शिवसेनेला हा वाघ नाही मांजर आहे असं म्हटलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे जुन्या व्हिडीओवर प्रश्न विचारायचे असतील तर माझ्यापेक्षा गोची तुमची होईल.

राज्यपालांच्या त्या वक्तव्याशी आम्ही असहमत
राज्यपालांच्या त्या वक्तव्याशी आम्ही असहमत. ते साफ चुकीचे बोलले आहेत. आम्ही स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरसुद्धा काही पक्ष याचा बाऊ आणि राजकारण करत आहेत. उरला प्रश्न छत्रपती उदयन राजे यांच्याविषयी, ते तर आमचे राजे आहेत. आंदोनल करण्याचा तसेच आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे

तेव्हा का प्रश्न सोडवला नाही
संजय राऊत यांना करायचे काहीच नाही. रोज गरम हवा सोडायची आहे. त्यांनी बॉयलर उघडावा आणि कपडे सुकवावेत. सत्तेत असताना संजय राऊत यांनी बेळगावचा प्रश्न का सोडवला नाही. सत्तेत असताना भवन का नाही बांधले? त्यामुळे केवळ तोंडाची गरम वाफ बाहेर काढून यातून राज्याचे भले होईल हा त्यांचा गैरसमज आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’

पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून...

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...