पुणे-येणाऱ्या काळात बांधकाम प्रकल्प उभारताना बांधकाम व्यवसायिकांनी हरित प्रकल्पाच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवावे आणि मोठे प्रकल्प उभारताना किमान सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन करावे असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.बांधकाम व्यवसायिकांनी नवीन इमरात बांधताना ती किती सुंदर आहे, त्यात किती अमिनिटीझ आहेत यापेक्षा त्या इमारतीमुळे कार्बन उत्सर्जन किती कमी होते, Carbon Footprints किती कमी करता येतात यावर भर देण्याचा सल्ला ही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.पटवर्धन बागेत डॉ. श्यामाप्रसाद उद्यान लगत एरंडवण्यातील रावेतकर ग्रुप, संजीवनी ग्रुप आणि खर्डेकर यांच्या संयुक्तीक पार्क साइड रेसिडेनसेस या पहिल्या 23 मजली बांधकाम प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर, संदीप खर्डेकर, संजीवनी ग्रुपचे संजय देशपांडे आणि प्रवीण घाडगे यांच्या हस्ते शौर्याचे प्रतीक असलेल्या मराठा साम्राज्याचे सेनापती बाजीराव पेशवा यांचे भव्य तैलचित्र, प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि पुणेरी पगडी भेट देऊन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
बांधकाम व्यवसायिकांचा शहर विकासात निश्चितच मोठा सहभाग असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.ह्या प्रकल्पाला शुभेच्छा देताना तो किती मोठा आहे किंवा छोटा आहे यावर काही ठरत नाही तर पक्षाचा कार्यकर्ता जर काही नवीन झेप घेऊ पहात असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहणे, कौतुक करणे ही आपली संस्कृती असल्याचे ही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

यावेळी प्रकल्पाचे विकसक अमोल रावेतकर, संदीप खर्डेकर, संजय देशपांडे यांच्यासह प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक पंचशील ग्रुप चे अतुल चोरडिया, अमॅनोरा टाऊनशिप चे अनिरुद्ध देशपांडे, ग्लोबल ग्रुप चे संजीव अरोरा, शिक्षण क्षेत्रातील दिग्गज पी. डी. पाटील, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे अरुण जिंदल, मराठी बांधकाम व्यवसायिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस आर कुलकर्णी, विद्यमान अध्यक्ष नंदू घाटे, कोहिनुर ग्रुप चे कृष्णकुमार गोयल,भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक,आमदार माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे,संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, योगेश टिळेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नगरसेवक, बांधकाम व्यवसायिक उपस्थित होते. अश्या स्नेहीजनांची आणि प्रेम उपस्थिती हीच माझी ऊर्जा आणि माझ्या आयुष्याची कमाई असल्याचे विकसक संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या प्रस्ताविकात नमूद केले.राजकारणणात योग्य संधी मिळेल तेव्हा मिळेल पण तोपर्यंत व्यवसायात मोठी झेप घेण्याचे ठरविले आणि एका छोट्या कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी ह्या छोट्या प्रकल्पाच्या भूमिपूजनास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांनी येण्याचे कबूल केले हेच भाजपा चे वेगळेपण दर्शवते असेही संदीप खर्डेकर म्हणाले.बांधकाम व्यवसायिकांकडून प्रचंड महसूल मिळतो ते शहराची स्कायलाईन विस्तारित आणि सुंदर करतात आणि त्याहीपेक्षा ह्या व्यवसायावर लाखो कुटुंबांचा चरितार्थ अवलंबून आहे तरीही बांधकाम व्यवसायिकांना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते याबाबत ही संदीप खर्डेकर यांनी खंत व्यक्त केली.
अमोल रावेतकर यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितलं की एरंडवणे परिसरातील हा पहिलाच 23 मजली प्रकल्प असून यात लायब्ररी, जिम, रिक्रिएशन हॉल, मिनि थियेटर यासह रुफटॉप गार्डन ची सुविधा उपलब्ध असणार आहे.यापुढील काळात देखील आम्ही एक टीम म्हणून काम करू आणि अधिकाधिक उत्तम दर्ज्याचे प्रकल्प उभारण्यावर आणि प्रीमियम घरांसोबत परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यावर भर देऊ असेही अमोल रावेतकर यांनी स्पष्ट केले.संजय देशपांडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेचा योग्य विचार करून त्यावर अंमल करण्यात येईल असे सांगतानाच ग्रीन बिल्डिंग ची संकल्पना आता चांगलीच रुजली आहे वा पार्क साइड या प्रकल्पाला ग्रीन बिल्डिंग चे 7 स्टार रेटिंग घेणार असल्याचे स्पष्ट केले.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक, अमोल रावेतकर यांनी स्वागत तर संजय देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

