Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बुद्धाचा, बंधुतेचा विचार जगाला शांतीचा मार्ग दाखवेल-  प्रा. डॉ. गौतम बेंगाळे 

Date:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान
पुणे : “बुद्धाचा देश म्हणून भारताला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या विचारांचे पाईक असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समृद्ध राज्यघटना दिली. त्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांचा, विचारांचा अंतर्भाव केला. हाच बुद्धाचा आणि बंधुतेचा विचार जगाला शांतीचा मार्ग दाखवेल,” असे मत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिदिनी’ आयोजिलेल्या नवव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपात प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ जलतज्ज्ञ अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रसंगी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब गार्डी आणि परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. गौतम बेंगाळे म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेत होत असलेल्या संमेलनात मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रज्ञावंत पुरस्कार मिळणे आनंदाची बाब आहे. गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महानुभावांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवण्याची गरज आहे. देशात नालंदासारखे शैक्षणिक संकुल पुन्हा उभारण्यासाठी लॉर्ड बुद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा प्रस्ताव सरकारसमोर मांडलेला आहे.”
अनिल पाटील म्हणाले, “पाणी हा आजघडीचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी मुबलक पाणी मिळणे गरजेचे असताना देशाच्या, राज्याच्या अनेक भागात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ सामान्यांनवर येते. त्यामुळे पाणी चळवळ प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. पाणी क्षेत्रात दुसरी जलक्रांती होण्याची गरज आहे. सामान्य माणसाने जागृत होण्याची गरज आहे. त्यासाठी बंधुतेच्या व्यासपीठावरून जागृती व्हावी. पाण्याचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे. प्राध्यापकांनी पर्यावरण, जल यासर्वांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.”
बंधुताचार्यप्रकाश रोकडे म्हणाले, “डॉ. बेंगाळे यांचे कार्य बाबासाहेबांच्या विचारांचे आहे. चांगल्या क्षेत्रातील माणसांना एकत्र आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे. बंधुतेचा विचार हाच जगात बंधुभाव पेरणार आहे. ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांनी याचे महत्व समजून घेतले पाहिजे.  
प्रा. डॉ. बंडोपंत कांबळे (औंध), प्रा. व्ही. बी. फसाले (मंचर), प्रा. एस. टी. पोकळे (मंचर), प्रा. के. बी. एरंडे (मंचर), अंबादास रोडे (मुळशी), प्रीती जगझाप (चंद्रपूर), संदीप राठोड (निघोज), चंदन तरवडे (कोपरगाव), विद्या गायकवाड (अहमदनगर) आणि महेश भोर (मंचर) या शिक्षकांना बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
प्रा. डॉ. के. जी. कानडे यांनीही मनोगते व्यक्त केली. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बाळासाहेब गार्डी यांनी आभार मानले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...