Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रत्नाकर गायकवाड यांनी लिहलेल्या गोयंका गुरुजीवरील पुस्तकांचे डॉ.शा. ब. मुजुमदार यांच्या हस्ते प्रकाशन….

Date:

पुणे,दि. १५
विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्यासोबत आलेल्या सानिध्याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी ‘द पाथ ऑफ सद्दधम्मा.. वुईथ गोयंका गुरुजी आणि
‘सद्दधम्माच्या मार्गावर..- गोयंका गुरुजींच्या सानिध्यात’ या विषयावर मराठी आणि इंग्रजी पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने खडकवासला आगळंबे येथील धम्म विनया केंद्रामध्ये सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती तथा ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पद्मश्री शा.ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संजीवनी मुजुमदार, माजी पोलीस महानिरीक्षक
एस. एम. मुश्रीफ,पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे व बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी निधीचे अध्यक्ष एम.टी. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रत्नाकर गायकवाड आणि सत्यनारायण गोयंका यांचा वीस वर्षापासूनचा स्नेह होता. हा स्नेह त्यांनी एका पुस्तकात शब्दबद्ध केला असून त्यांनी लिहिलेल्या’ द पाथ ऑफ सद्दधम्मा विथ गोयंका गुरुजी’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘सद्धम्माच्या मार्गावर गोयंका गुरुजींच्या सानिध्यात’ करण्यात आला आहे.ही दोनही पुस्तके पुण्याच्या स्वयंदीप प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.

या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. मुजुमदार प्रकाशनाप्रसंगी बोलताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती फार महान होती. त्यांच्याकडे अनेक धर्माचे पर्याय होते व त्यांना अनेक जण आपल्या धर्मात घेण्यासाठी उत्सुक होते, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन,चिंतन व अभ्यास करून बौद्ध धम्माचा अंगीकार केला. हा धम्म जगात श्रेष्ठ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी हे पुस्तक प्रकाशित होणे ही फार मोठी उपलब्धी आहे. सत्यनारायण गोयंका गुरुजीने बुद्धांचे तत्वज्ञान विशेषत: विपश्यना यामधून बौद्ध तत्वाज्ञानाचा सार याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलेले आहे. बुद्धानंतर धम्माचा सार विपश्यनेच्या माध्यमातून जगभर पोहविणारे एकमेव गोयंका गुरुजी होत. त्यांनी विपश्याना या विद्येचे पुनर्जीवन केले.असेही ते म्हणाले.गोयंका गुरुजी यांचे कार्य ऐतिहासिक होते. त्यांची प्रज्ञा, मैत्री ही शिकवण आजच्या काळाशी सुसंगत आहे, त्यानुसार सर्वांनी वाटचाल करण्याची गरज असल्याचेही मुजुमदार यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले,,गायकवाड यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत अत्यंत उत्कृष्ट कामे केली. सिम्बॉयसिस येथील डॉ.आंबेडकर म्युझियम साठीही त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिलेले आहे. शासन सेवेत असतानाच त्यांनी विपश्यनेचे अनेक मोठमोठे कोर्स केले. विपश्यना आचार्य गोयंका गुरुजी यांना वेळोवेळी अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी मदत केली. त्यांचे आणि गोयंका गुरुजी यांचे वीस वर्षांचे ऋणानुबंध होते, ही फार मोठी बाब आहे. त्यांना प्रत्यक्ष गोयंका गुरुजी यांचा एवढा मोठा सहवास लाभला त्यामुळे ते खूप भाग्यवान आहेत असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

प्रारंभी प्रास्ताविकात रत्नाकर गायकवाड यांनी हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मैत्री काय असते? यापासून सुरु झाली, असे सांगून गोयंका गुरुजी यांच्याशी माझे कसे स्नेहबंध होते याबाबत सविस्तर सांगितले. त्यांनी काही प्रसंग सांगून धम्म व गुरुजींची मैत्री कशी अडचणीच्या वेळी मदत करू शकते याची बोलकी उदाहरणे दिली. गोराई येथील पॅगोडाच्या बांधकामाच्या संदर्भात आलेले अडथळे व त्यावर मिळालेले यश याबाबतही त्यांनी आपले अनुभव कथन केले.या पुस्तकात जे अनुभवले तेच लिहले.गुरुजी यांचे विचार, सद्धम्म व विपशना हे समजण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरावे, अशा भावना त्यानी यावेळी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संस्थेच्या माध्यमातून धम्म विनया मॅनेस्ट्री
प्रकल्पाबद्दल हे केंद्र कसे उभे राहत आहे व या माध्यमातून भविष्यामध्ये काय प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत, याबाबत अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता एम.टी. कांबळे यांनी भूमिका प्रस्तविकात मांडली.

या यावेळी काही मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये महावितरणचे उत्तमराव झाल्टे, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, पुणे महापालिकेचे निवृत्त उद्यान प्रमुख यशवंत खैरे, एस. आर. कुलकर्णी,यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड,श्री.वाणी,सुशील मोहिते, यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला निवृत्त सनदी अधिकारी भा.ई.नगराळे, डॉ. विनोद शहा, दत्ताजी गायकवाड,नगरसेवक अविनाश साळवे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी तर आभार पुणे महापालिकेतील मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणूक लढवणार:वनराजची पत्नी सोनाली सह बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर दिसतील निवडणूक रणांगणात

पुणे-स्वतःचा नातू आयुष कोमकर खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला...

पुणे विमानतळावर तस्करीचा 2 कोटी 29 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा पकडला

बँकॉकहून आलेल्या तस्करास अटकपुणे - येथील विमानतळावर...

हिंदूविरोधात मस्ती करणारे 2 पायांवर घरी जाणार नाहीत- मंत्री राणे

परभणी :सरकार हिंदूंच्या हितासाठी काम करत आहे. हिंदू समाजाविरोधात...