ऍथलेटिक्समधीची पुस्तके, क्रिडा साहित्य प्रादेशिक भाषांतून खेळाडूंपर्यंत पोचवणार – आदील सुमारीवाला

Date:

पुणे – खेळांचे तंत्र, मंत्र आत्मसात करणे खेळाडूंना सोपे जावे यासाठी खेळांची पुस्तके, नियमावली वगैरे साहित्य प्रादेशिक भाषांमधून खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी, पंच यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी संघटनेने प्रोत्साहन द्यायला सुरूवात केली आहे. याची सुरूवात व प्रेरणा ही राम भागवत सरांची असून त्यांनी पहिल्यांदा ऍथलेटिक्सच्या आंतरराष्ट्रीय नियमावलीचे मराठीत भाषांतर करून ते महाराष्ट्राच्या गावागावतील खेळाडू, प्रशिक्षकांपर्यंत पोचवले होते. त्यांचे हे पुस्तक म्हणजे मोठा संदर्भ ग्रंथच आहे, असे प्रतिपादन ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदील सुमारीवाला यांनी आज येथे केले.

समर्थ मिडिया सेंटर प्रकाशित, कै. राम भागवत यांनी लिहिलेल्या “उड्यांचे अधुनिक तंत्र” या पुस्तकाचे प्रकाशन मॅरेथॉन भवन येथे सुमारीवाला यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, ऍथलेटिक्सचे मार्गदर्शक व भागवतसरांचे सहकारी बाप्टिस्ट डिसूझा, कार्यक्रमाचे संयोजक व पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड, महाराष्ट्र मंडळच्या कार्यवाह नेहा दामले, प्रकाशिका मनिषा बाठे, पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेच्या सचिव गुरबन्स कौर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय श्रीमती मधुराणी राम भागवत, मिहीर भागवत व त्यांचे कुटुंबिय, अनेक खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्याचे क्रिडा आयुक्त ओमप्रकाश बोकोरिया हे अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाहीत.

जुन्या आठवणींना उजाळा देत आदिल सुमारीवाला म्हणाले, भागवत सरांशी आपली पहिली ओळख १९७९ साली गीतांजली एक्सप्रेसमध्ये झाली. एक राष्ट्रीय स्पर्धा जिंकून मी दुसरी खेळायला चाललो होते, तर भागवत सर त्यांनी स्वत: हाताने तयार केलेले इलेक्ट्रॉनिक घड्याळ घेऊन याच स्पर्धांसाठी चालले होते. त्यावेळी आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक घड्याळाची साधी चर्चाही नव्हती तर घड्याळे कशी असणार! तेव्हापासून अनेकवेळा भागवत सरांना भेटण्याची संधी मिळाली अन प्रत्येकवेळी सरांकडून काही तरी नविन ऐकायला, शिकायला मिळत असे. आपल्या देशात सर्व राज्यातील खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, अधिकारी हे प्रादेशिक भाषेतूनच एकमेकांशी संवाद साधत असल्याने त्यांना खेळांचे तंत्र, नियम हे प्रादेशिक भाषेतून लवकर आत्मसात करता येतात. त्यामुळेच आता राष्ट्रीय संघटनेनेही क्रिडा साहित्य म्हणजे लिखित साहित्य हे प्रादेशिक भाषांमधून राज्याच्या कानाकोप-यातील खेळाडूंपर्यंत पोचवण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्यायला सुरूवात केली आहे. ऍथलेटिक्सबद्दल सांगायचं झालं तर भागवत सरांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गोष्टी या मराठीत भाषांतर करून ठेवल्या आहेत. उड्यांचे तंत्रज्ञान हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे संदर्भ ग्रंथ किंवा कोष असल्याने त्याचा खेळाला, खेळाडूंना, प्रशिक्षकांना चांगला फायदा नक्की होईल असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

महाराष्ट्र मंडळच्या नेहा दामले म्हणाल्या, हे पुस्तक प्रसिद्ध करण्याची जबाबदारी मंडळाचे कार्यवाह दामले यांनी घेतली होती, पण त्यांचे अचानक निधन झाल्याने आमची हे पुस्तक प्रकाशित कऱण्याची संधी हुकली. भागवत सर, डिसूजा सर हे ऍथलेटिक्सचे भीष्माचार्य आहेत. सरांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी मुलांना उंचउडी, पोलव्हॉल्टमध्ये प्रशिक्षित करून त्यांना राष्ट्रीय पातळीवर पोचवले. त्यांचे अनेक खेळाडू आजही चमकत आहे. खेळांचे तंत्र मराठीत आणून त्यांनी तीन चार पिढ्या घडवल्या आहेत.

कार्यक्रमाचे संयोजक व पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड म्हणाले, राम भागवत, मोरेश्वर गुर्जर, डिसूझा ही नेहमी मैदानावर दिसणारी माणसं. त्यांच्या आयुष्याचे धेय्य हे खेळ अन खेळाडू तयार करणे हेच होते. राम भागवतसर आणि डिसूजा यांच्यामुळेच सणस मैदानावरील ऍथलेटिक्सचा तंत्रशुद्ध ट्रॅक तयार झाला. बालेवाडी क्रिडा संकूल झाल्यावर पुण्यात झालेल्या अनेक राष्ट्रीव व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये मी सरांना झोकून देऊन काम करताना बघितले आहे. खेळेचे मैदान हेच त्यांची जीवन होते. भागवत सरांनी त्यांच्याकडे असलेले ऍथलेटिक्सबद्दलचे ज्ञान लिहून ठेवले हे आपले भाग्य असून ते आज आपल्यापर्यंत पुस्तक रूपाने पोचत आहे.

प्रकाशिका मनिषा बाठे म्हणाल्या, ऍथलेटिक्स अधुनिक उड्यांचे तंत्र हे पुस्तक म्हणजे उड्यांच्या क्रिडा मार्गदर्शकांसाठी संदर्भ कोषच आहे. सरांनी एकूम 831 पाने हाताने लिहिली होती. त्यात खेळांच्या शास्त्रोक्त अकृत्यांची 583 पाने जोडून हा ग्रंथ साकारला आहे. मराठीतून आंतराराष्ट्रीय स्तरावर इंग्रजीतून भाषांतर होऊन हा संदर्भ कोष पोचू शकतो इतके ज्ञानभांडार त्यात आहे. हे पुस्तक तयार करतानाचा अनुभव हा फारच चांगला होता. मल्लखांब हा माझा खेळ पण या पुस्तकाच्या निमित्ताने सरांच्या सान्निध्यात राहून मी ऍथलेटिक्सची कशी झाले ते कळलेच नाही.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वल करून व भागवत सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. स्वागतपर प्रास्ताविक करताना मिहीर भागवत म्हणाले हा “उड्यांचे अधुनिक तंत्र” हा वडिलांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. करोनाच्या काळात त्यांना आम्ही पेन आणून द्यायचो ते काही तरी लिहीतात एवढच आम्हाला महिती होते. पण त्यांनी काय लिहिले आहे हे कळल्यावर ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून त्यांचे स्वन्प साकार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेच्या सचिव गुरूबन्स कौर यांनी आभार मानताना, भागवत सरांनी आपल्याला हायजंपसाठी प्रोत्साहित केले अन मला पहिले मेडल सरांमुळे मिळाले अशी आठवण सांगितली. सूत्रसंचलन जलतरण संघटनेच्या नीता तळवलीकर यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...