मुंबई-शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा देत या अधिकाराचा वापर देशातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टीकोनातून शिक्षणात सुधारणा करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिकांना देण्यात आली. यावर गेली कित्येक वर्ष महानगरपालिका काम करत आहेत. मात्र काही त्रृटी आजही या शाळांमध्ये
आढळून येतात. अशाचकाही त्रृटींची माहिती एका महिलेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली आणि तातडीने त्यावर कारवाई करण्याची शिफारस त्यांनी केली.
याविषयी बोलताना त्या म्हणाल्या,“महानगरपालिका आपले काम बजावत आहेत मात्र काही गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटल्या होत्या, महिलादिनाच्या निमित्ताने भेटलेल्या एका महिलेने खार, वरळी आणि डम्पिंगग्राऊंड जवळच्या बीएमसी शाळांमध्ये असणाऱ्या समस्या माझ्या निदर्शनाला आणून दिल्या आणि मी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली आणि त्यांनी तिथे जाऊन या समस्यांवर तोडगा काढला.”
अमृता फडणवीस यांच्या पुढाकाराने या शाळांमध्ये चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सोयींमध्ये चांगले बेंचेस, स्वच्छतागृह आणि शिक्षकांची नेमणूक यांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांना
चांगल्या सोयीसुविधांमध्ये आपल्या शिक्षणाचा अधिकार बजावता येणार आहे.
या तीन शाळांव्यतिरिक्त इतरही काही शाळांमध्ये हिच परिस्थिती आहे. या परिस्थितीतही बदल करण्यासाठी महापालिका काम करत असल्याचे म्हणत अमृता यांनी“महानगरपालिकेतील अधिकारी या शाळांची दखल घेत असून जिथे त्यांचे हात तोकडे पडत आहेत तिथे एखादी गोष्ट आपल्या निदर्शनास आल्यास ती अमृताजी किंवा त्या संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आव्हान त्यांनी जनतेला केले आहे.”

