रक्तदान ही काळाची गरज-आ. चंद्रकांतदादा पाटील

Date:

पुणे-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, रक्ताची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे रक्तदान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि मातोश्री जनाबाई बलभीम मोकाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रबोधन विचाधाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार शिवसेना नेते चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक अॅड. योगेश मोकाटे, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, नवनाथ जाधव, शिवसेनेचे प्रशांत बधे, किरण साळी, नंदू घाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत, अनेक रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचारासाठी रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांतून येत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी रक्तदान ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता यासाठी रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी काही रक्तदात्यांचे आ. पाटील यांनी अभिनंदन करुन, प्रमाणपत्र ही प्रदान केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...