पुणे- कोरोना पार्श्वभुमीवर रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी गुलतेकडी येथील गिरीधर भवन परिसरात माजी सभागृहनेते व नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच प्रत्येक रक्तदान करण्याऱ्या व्यक्तीस सॅनिटायझर, वाफेचे मशीन भेट देण्यात आली..
यावेळी श्रीनाथ भिमाले म्हणाले कोरोना काळात कार्यक्रमला मिळालेला प्रतिसाद अतिशय महत्त्वाचा आहे रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी असे कार्यक्रम करणे गरजेचे आहे रक्तदान करणे म्हणजे एखाद्याला जीवनदान देणे. प्रत्येक नागरिकाने रक्तदान करणे गरजेचे आहे . शहरात रक्ताचा तुटवडा भासू नये. व ज्या व्यक्तीस रक्ताची गरज आहे त्या व्यक्तीस ते तात्काळ मिळावे असे श्री.भिमाले यांनी सांगितले यावेळी महिला अध्यक्ष सौ स्वाती शेरला, सुयोंग ग्रुपचे नितीन शहा, NKGSB बँकेचे मेनेजर शिवराज भाले , हरीष परदेशी ,बाळासाहेब शेलार, सचिन खंडागळे, मनोज कांबळे, विनायक कडवळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमची सुरूवात करण्यात आली.
पुणे रक्त पेढी हडपसर यांच्या मार्फत शिबीर भरविण्यात आले.कार्यक्रमाचे संयोजन गुलतेकडी एकता प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश शेरला यांनी केले.तसेच
प्रतिष्ठानच्या वतीने संजय साठे, अविनाश सर्वेगोड, अजय शिंदे, नझीर शेख, महेश सांळूखे, जयंत पानसकर, हेमंत जगताप, रूपेश राजभर, अक्षय मदणे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला..

