मुंबई- सध्या राज्यात रक्त साठा खूप प्रमाणात कमी झाला होता आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी दिव्याज फॉउंडेशन यांनी आज गामदेवी, मुंबई येथे शारदा मंदिर शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन बँकर, सामाजिक कार्यकर्ता अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी त्यांनी स्वतः देखील रक्तदान केले.या शिबिरा बद्दल बोलताना त्यांनी सांगितले, ” सद्या राज्यात रक्ताची प्रचंड कमतरता आहे आणि ही कमतरता दूर करण्यासाठी साठी निरोगी लोकांनी पुढे येऊन रक्तदान केले पाहिजे.”या शिबिराला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला व दिव्याज फॉउंडेशन तर्फे भविष्यात सुद्धा असे अनेक सामाजिक उपक्रम केले जातील असे सांगण्यात आले.


