भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पामध्ये चैतन्य सोहळा २०१७ चे आयोजन करण्यात आले होते . बिजेएसच्या या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील ठाणे व मेळघाट या आदिवासी भागातील मुलांसह २५ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सुमारे ८०० मुले व मुली शिक्षण घेत आहेत. मागील वर्षीपासून बीजेस शैक्षणिक संकुलामध्ये चैतन्य सोहळ्याचे आयोजन केले जाते . याहीवर्षी दि. १ फेब्रुवारी २०१७ रोजी दुसऱ्या चैतन्य सोहळ्याचे आयोजन केले होते. यासाठी पुणे येथून बीजेस चे सदस्य तसेच विविध जिल्ह्यातील पालकही उपस्थित होते.
या चैतन्य सोहळ्यास विध्यार्थ्यानी विविध गुणदर्शन सादरीकरण केले त्यामध्ये वारी ,कीर्तन व भारुड हा प्रकारही मुलांनी सादर केला . विविध सामुहिक नृत्य, फनी डान्स, समूहगीत, नाटिका इ. सादर केल्या. विध्यालयाचे शिक्षक श्री. विलास गुंजाळ लिखित ‘शब्दरूप आले मुक्या भावनांना’ या नाटिकेचे सादरीकरण हि विध्यार्थ्यानी केले यामधून प्राणिमात्रांच्या मनातील भावना व्यक्त होत होत्या. माणसातील माणूसपण हरवत चाललेले आहे पण प्राण्यातील नाही हा मुख्य संदेश या नाटिकेतून दिला गेला . याचवेळी विध्यार्थ्यानी सूर्यनमस्कार , योगा प्रात्यक्षिके व थरारक मनोऱ्यांचेही सादरीकरण केले. विविध जिल्ह्यातून आलेल्या मुलांच्या पालकांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवत होते तसेच ते बीजेस विध्यार्थ्यावर घेत असलेल्या प्रयत्नावर अतिशय समाधानी होते. तत्पूर्वी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.शांतीलाल मुथ्था यांनी प्रास्ताविक केले व विध्यार्थ्यांना १० वी व १२ वी च्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पुणेचे मा. रमेशजी काळे यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या .
यानंतर वसतीगृहातील ज्या विध्यार्थ्यानी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळविले अशा विध्यार्थ्यांचा गुणगौरव मा. शांतीलालजी मुथ्था, सौ. सरला मुथ्था, श्री. सेटिया, सौ. पारख, श्री. माणिकराव सातव यांचे हस्ते करण्यात आला .
यावर्षी वसतिगृह विध्यार्थी कु. अजय नंदकिशोर पाटणकर व कु. प्रसिका विनोद वानखेडे यांना ‘आदर्श वसतिगृह विध्यार्थीनी’ म्हणून गौरविण्यात आले .
या कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष शांतीलाल बोरा, महाविध्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब सांगळे, विध्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, वसतिगृह व्यवस्थापक सुरेश साळुंके , साईनाथ रापतवार, डॉ. संगीता लगड, उपप्राचार्य दिलीप देशमुख व सर्व शिक्षक वृंद , अधीक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक पवार पी.आर. यांनी केले व आभार शांतीलाल बोरा यांनी मानले.

