नालेसफाई अन निष्काळजीपणा भाजपाचा मनपा प्रशासनाला इशारा !

Date:

पुणे-भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या शिष्टमंडळाने आज पावसाळी कामांच्या नियोजनातील निष्काळजीपणाबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पावसाळा सुरू झाला तरी अपूर्ण असलेली नालेसफाई, निकृष्ट दर्जाची पावसाळी कामे, अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत असलेला राडारोडा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुराच्या सुरक्षेचा धोका असणाऱ्या ठिकाणांची वस्तुस्थिती देखील यावेळी आयुक्तांच्या लक्षात आणून देत, तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याची मागणी केली.

वाढता पाऊस आणि संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रभाग स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करावे अशी मागणी मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, ‘अती पावसाच्या कालावधीत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा याची दक्षता घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विविध विभागात पोलीस प्रशासन पुणे महानगर परिवहन महामंडळ स्मार्ट सिटी यातील समन्वय महत्त्वाचा आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य ठिकाणे, रस्त्यात पडणारे खड्डे, पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग, मोठे नाले, पुरामुळे बाधीत होणारे परिसर, निवारा यांची संख्या, साधन सामग्री आदींबाबत तातडीचे नियोजन होणे आवश्यक आहे.’

यावेळी जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्षा वर्षा तापकीर, सरचिटणीस गणेश घोष, उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सुशिल मेंगडे यांच्यासह मंडल अध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...