हवे तेवढे गुजरात दौरे करा पण मुळा मुठा वाचवा.. रिव्हर डेव्हलपमेंट हटवा..
पुणे – पाण्याला आणि वाऱ्याला मुक्तपणे वाहण्याचा, पक्ष्यांना स्वच्छंदपणे उडण्याचा आणि माशांना जगण्याचा हक्क देण्यासाठी पर्यावरणपूरक नदीसंवर्धन कसे करता येईल याचे प्रात्याक्षित तर दुसरीकडे नदीकाठावर खोदकाम, सायकल ट्रॅक, कॉंक्रिटीकरॅण, सुशोभीकरण करुन जैवविधिता कशी नष्ठ होईल याचा देखावा थ्रीडी देखावा नाना पेठ येथील श्री संभाजी मित्र मंडळाने सादर केला आहे. पुण्यातील पर्यावरणप्रेमींच्या अभ्यासपूर्ण संशोधनाचा या देखाव्यासाठी उपयोग करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचा मुळा-मुठा नदी सुधार योजनेचा प्रकल्पाची वास्तविकता आणि गरज याविषयीची जनजागृती करणारा देखावा मंडळाने सादर केला आहे. पुण्यातील नद्यांवर उपचार करण्याची गरज असून केवळ मेकअप करुन प्रश्न सुटणार नाहीत. या प्रकल्पामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या रोखण्यासाठी मंडळाच्यावतीने सादर केला आहे. माय अर्थ फांउडेशनने यासाठी विशेष प्रयत्न केले.
मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले की, पालिकेचा नदी सुधार हा प्रकल्प फसवा असून हा बांधकाम प्रकल्प आहे. या योजनेतील ८० टक्के रक्कम ही केवळ कॉंक्रिटीकरणासाठी वापरली जाणार आहे. नदीचे स्वरुप बदलून कॅनॉलचे स्वरुप येणार आहे. नदीची रुंदी मोठ्याप्रमाणावर कमी केल्यास पूरपातळीमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. त्यामुळे भविष्यात हा प्रकल्प राबविल्यास पुणे शहरात हाहाकार माजणार आहे. नदीकाठच्या पाणथळ जागांमध्ये जैवविविधता धोक्यात येणार आहे. स्थलांतरित पक्षी अशा भागांमध्ये येत असतात. मात्र या जागांचा विकास केल्यास हे पक्षी पूर्णपणे नाहीसे होतील. नदीला बांध घातल्यास आसपासचे जलप्रवाह हे नदीपासून पुर्णपणे तोडले जातील. त्यामुळे पाणी पातळीवर याचा प्रचंड परिणाम झालेला पहावयास मिळणार आहे. ख-या अर्थाने जर नदी सुधार करायचा असेल तर प्रथम त्याचा पाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.