पुणे- ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न सुरू झाला आहे. देशमुखांच्या ईडी चौकशीची आम्हाला चिंता वाटत नाही. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून असे प्रकार सुरू झाले आहेत. नैराश्यातून या यंत्रणांचा वापर होत आहे. ईडीसारख्या चौकशा आमच्यासाठी नव्या नाहीत. केंद्र सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, अशी टीका आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेतून केली .
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांसह आज पाच ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. यावरून राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी चौकशीवरून मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.नैराश्यातून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा घणाघात शरद पवार यांनी केला. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला.
ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सूड उगवण्याचा नवा पॅटर्न सुरु झाला आहे. अनिल देशमुखांच्या चौकशीची आम्हाला चिंता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल, असा विश्वास यांनी यावेळी व्यक्त केला.
शरद पवार काय म्हणाले?
ईडीने अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई हे आमच्यासाठी नवीन नाही. त्यांच्या हाती काही लागले नाही म्हणून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. यंत्रणांचा राजकीय वापर होतोय. काल भाजपने केलेला ठराव हा त्याचाच भाग आहे.
ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न सुरू झाला आहे. देशमुखांच्या ईडी चौकशीची आम्हाला चिंता वाटत नाही. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून असे प्रकार सुरू झाले आहेत. नैराश्यातून या यंत्रणांचा वापर होत आहे. ईडीसारख्या चौकशा आमच्यासाठी नव्या नाहीत. केंद्र सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असे पवार म्हणाले.
विरोधी पक्षांच्या बैठकीवर खुलासा
प्रशांत किशोर बैठकीबाबत गैरसमज आहेत. तसेच सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीबाबतही गैरसमज निर्माण झाले आहेत. मागील सहा महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यावर काही मार्ग काढता येईल का हा त्या बैठकीचा उद्देश होता, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आज सकाळी देशमुख यांनी मुंबई व नागपूर येथील घरांवर ईडीकडून एकाचवेळी छापे टाकण्यात आले. त्यामुळं देशमुख अडचणीत आले आहेत. ईडीसह सीबीआयकडून यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी सध्या कुटूंबियांचे जबाब घेतले जात आहेत.
काश्मीर विषयी …
पवार म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरविषयी जे काही म्हणाले त्याचे स्वागत असून देेशाच्या ऐक्याच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. मात्र, आधी काश्मीरला स्वतंत्र दर्जा होताच,पण प्रधानमंत्र्यांनी तो काढून घेतला.आम्ही त्यांना असा निर्णय नको घ्यायला याबाबत सांगत होतो. मात्र, त्यांनी ते ऐकलं नाही.आता तो निर्णय चुकला असे त्यांना वाटत असेल तर चांगले आहे.फक्त आता घेतलेला निर्णय बदलू नये अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावर भाष्य करताना पवार म्हणाले, कँन्सर हॉस्पिटल रूग्णांच्या नातेवाईकांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्याबाबत डॉक्टरांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली होती. पण स्थानिकांनी तक्रार केली म्हणून त्यावर काही अडचण निर्माण झाली आहे. आता तो प्रश्न सुटला आहे.
मराठा आरक्षणावर भाष्य करताना पवार म्हणाले, मराठा आरक्षणासंबंधी निर्णय घेण्याचा केंद्राकडेच अधिकार आहे, ही अगदी स्वच्छ भूमिका आहे. राज्य सरकार आणि मराठा संघटना यांच्यात संवाद सुरू आहे. त्यातूून मराठा समाजातील समस्या सोडवणार आहे.
दिल्लीतील विविध पक्षांच्या, संघटनांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीबाबत बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधी विविध पक्षांची बैठक घेतली. राजकीय अभिनिवेश न बाळगता संसदेत आपली भूमिका मांडण्यासाठी ही बैठक होती. त्यात दिल्लीत सहा महिन्यांहून अधिक काळ रस्त्यावर जे शेतकरी राजकीय पक्षाला वगळून आंदोलन करत आहे.मात्र त्याकडे केंद्र सरकारकडून त्याची आतापर्यंत दखल घेतलेली नाही. पण एका महत्वाच्या प्रश्नाला समर्थन कसे देता येईल यावर बैठक होती. संसदेचे काम सुरू झाल्यावर तिथे हा विषय कसा मांडता येईल यावर चर्चा करण्यासाठी ही बै

