भाजपच्या हलगर्जीपणामुळे पुण्यात कोरोना वाढला:महापालिका बरखास्त करा – नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Date:

पुणे- शहरात सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी कोरोना साथीच्या आजारावर उपाययोजना करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिका बरखास्त करावी. अशी मागणी नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करत आहेत. त्यांनी उपाययोजना न करता केवळ हलगर्जीपणा करून शहरातील नागरिकांचा जीव वेठीस धरला आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती, लहान मुले यांना जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागते. सत्ताधारी म्हणून पुणेकरांना न्याय देण्यासही भाजपा असमर्थ ठरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत राज्य शासनाला महापालिका विसर्जित करण्याचा अधिकार असतो. त्यानुसार महापालिकेवर लादण्यात आलेल्या कर्तव्याचे पालन केले नाही. किंवा महापालिका उपाययोजना करण्यात सक्षम नसून दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करत असेल. तर राज्य शासन महापालिका बरखास्त करू शकते. असे पत्रात नमूद केले आहे.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसाला ३ हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारी, खासगी रुग्णालयावरीलही ताण वाढत चालला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. महापालिका शहरातील नागरिकांचा जीव वाचवण्याबरोबरच कोरोना रुग्णांची वाढही थांबवू शकत नाही. पुणे शहरातील कोरोना नागरिकांवर महापालिकेने किती खर्च केला. ही माहिती दडपून ठेवली जात आहे. स्वब सेंटरवर ५०० रुग्ण आले तरी १०० रुग्णांची तपासणी केली जात आहे.

पुणे महापालिकेने कोरोनाच्या धर्तीवर कायमस्वरूपी डॉक्टरची भरती प्रक्रिया राबवली आहे. पण १८ महिन्याचा कालावधी उलटूनही भरती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. पालिकेच्या सीसीसी सेंटरवर डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे ताबडतोब महापालिका बरखास्त करण्याची मागणी भैय्या जाधव यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...