पोलिसांच्या ताब्यातील राष्ट्रवादीच्या महिलेला मारहाण करण्याची भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्याची मस्ती उतरलीच पाहजे,पूर्ण सत्ता मिळाल्यावर हे काय करतील ?

Date:

महिलांवर हाथ उचलणांऱ्यावरील  गुन्हे मागे घ्या म्हणणाऱ्यांना काय म्हणावे ? अपप्रवृत्तीला पाठीशी घालणारी भूमिका त्यांच्यासह सर्वांनाच मारक

पुणे- आंदोलक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर देखील पोलिसांच्या समक्ष ,पोलिसांचेकडे तोडून या महिलेला भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण करणे म्हणजे हि किती मस्ती ,कोणत्या थराला गेलेली आहे यांना पूर्ण सत्ता मिळाल्यावर ती कुठपर्यंत पोहोचेल ? असा सवाल उपस्थित करत आज पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते अंकुश काकडे, ,शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे,संजय मोरे, आम आदमी पार्टीचे मनोज माने, कॉंग्रेसच्या संगीताताई तिवारी तसेच बाबुराव चांदेरे,बाळासाहेब बोडके,प्रदीप देशमुख,मृणालीनीताई वाणी, सदानंद शेट्टी,उदय महाले,किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव,महेश हांडे,दयानंद इरकल,दिपक कामठे, निलेश वरे आदींसह मोठ्या अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ज्यांना मारहाण झाली त्या वैशाली नागवडे देखील या आंदोलनात सहभागी होत्या.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले,’देशाची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठल्या महिला भगिनीवर हात उचलल्यापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाची मजल आजपर्यंत गेली नाही. परंतु दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांमध्ये आपले निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनींना पुणे भाजपच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी अक्षरशः जोर-जोरात फटके मारले त्यांचा पदर ओढण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून पुण्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणी मध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. असे असताना काल घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत आज निषेध आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या निषेध आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत काळया रंगाच्या फिती लावत सुमारे एक तास शांतपणे बसून या घटनेचा निषेध व्यक्त केला. प्रशांत जगताप पुढे म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी कुठल्याही आंदोलनात कसे वागावे याबाबतची आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवून दिली असून कुठल्याही आंदोलनात वैचारिक मतभेद असले तरी विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे.प्रत्येक आंदोलन हे आदर्श आंदोलन झाले पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आम्हाला तशी शिकवण आम्हाला पवार साहेबांनी घालून दिलेली आहे. असे असताना आमच्या महिला भगिनींना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. त्या आरोपींवर परवा गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासनास विनंती आहे की, सदर आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी , या कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला जाईल की पुन्हा कोणीही अशा प्रकारची गैरवर्तन करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. परवा ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन झाले त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस ,चंद्रकांत पाटील यांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली. नाही याउलट यापुढील काळात यापेक्षा उत्तमप्रकारे प्रत्युत्तर काढण्याची भाषा करत असतील तर ते एक प्रकारे महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची पाठराखण करण्यासारखेच आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणविसांनी, भाजप सारख्या पार्टी विथ डिफरन्सचा नारा पिटनाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी भाषा करणे खरोखरच अशोभनीय आहे. या गोष्टीचा देखील आम्ही या मूक आंदोलनात निषेध व्यक्त करतो”.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...