राज्यात भाजपची पीछेहाट : ८० टक्के जागा महाविकासआघाडीला –बाळासाहेब थोरातांचा दावा

Date:

१३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष

“ग्रामपंचायत निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीतील ८० टक्के जागा महाविकासआघाडीमधील पक्षांना मिळालेल्या आहेत. महाविकासआघाडीवर जनतेने विश्वास दाखवला आहे. आम्ही केलेल्या कामांवर लोकं समाधानी आहेत.” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.तसेच, “राज्यात भाजपाची पिछेहाट या निवडणुकीतून दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष यांची स्वतःची गावं देखील त्यांच्या ताब्यात राहिलेली नाहीत. या ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आलेला नाही. मात्र खोटं बोलण्यात ते पटाईत असल्याने ते माध्यमांवर कदाचित वेगळं काही सांगू शकतात. पंरतु हे स्पष्टपणे दिसत आहे की या निवडणुकीत भाजपाची मोठी पिछेहाट झालेली आहे. महाविकासआघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे.” असं देखील थोरात यांनी यावेळी सांगितलं.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतलेल्या पत्रकारपरिषदेनंतर, काँग्रेसने देखील पत्रकारपरिषद घेत या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाची माहिती दिली.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, “कोल्हापूर, नंदुरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, वाशी, बुलढाणा या १३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष राहिलेला आहे. याशिवाय विदर्भामधील यश लक्षणीय आहे, ५० टक्के जागा काँग्रेसला मिळाला असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. निर्विवाद यश विदर्भात काँग्रेसला मिळाल्याचं दिसून येत आहे. मराठवड्यात देखील अनेक ठिकाणी काँग्रेसला यश मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अजून अनेक ठिकाणचे निकाल समोर यायचे आहेत. एकूणच १४ हजार ग्रामपंचायतीं पैकी चार ते साडेचार हजार ग्रामपंचायती काँग्रेसला मिळाल्या आहेत.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता...

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...