पुणे दि ३० -देशातील विविध राज्य सरकारांच्या कारभारात आदर्श ठरत असलेल्या, महाराष्ट्राच्या ‘लोकाभिमुख ‘मविआ सरकार’च्या स्थीरतेत अडथळे निर्माण करत, केंद्रीय यंत्रणांच्या आधारे सत्तेतील नेत्यांविरोधी कट- कारस्थाने करून, महाराष्ट्रातील सरकारला जाणीव पुर्वक अर्ध-कालावधीतच् पायउतार व्हावयास भाग पाडल्यामुळे व शिवसेनेच्या आमदारांची फोडाफोडी केल्यामुळे व ‘भाजपने २०१९ लाच मुख्यंमंत्रीपदाचा शब्द देऊन ही शिवसेनेस फसवले’ या आरोपातून मुक्त होण्यासाठी व
भाजप नेतृत्वाची ‘देशभर मलीन झालेली प्रतिमा’ सुधारण्याच्या नादात (अर्थातच ‘डॅमेज कंट्रोल’ च्या प्रयत्नात) ‘सेनेच्या फुटीर गटाच्या’ नेत्यास ‘मुख्यमंत्री’पद देण्याचा व त्या द्वारे ‘संपुर्ण शिवसेना हायजॅक’ करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली..!
तसेच, माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना “सेनेकडे एकहाती सत्ता हवी असल्यास काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे” देखील मा प्रांताध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षाचे नेते मा बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील सांगितले होते”…!
त्यावर उद्धव ठाकरेंनी बंडखोर सेना आमदारांना स्पष्ट करून वर्षा निवास स्थान देखील लगोलग सोडले होते.. याचे स्मरण पुन्हा करून देत आहोत.. असे ही गोपाळ तिवारी यांनी सांगितले..
राज्याच्या राजकारणात महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात व जनमानसांत खलनायक ठरलेल्या भाजप नेतृत्वा पुढे ‘डॅमेज कंट्रोल’ साठी अखेर हाच पर्याय होता..
यातून भाजप ने ‘शिवसेना बंडखोर आमदारांच्या’ गटास मुख्यमंत्री पद देऊन ‘रिमोट कंट्रोल’द्वारे राज्य सरकार ला कठपुतली बनवु पाहतील काय (?) याचे ऊत्तर येत्या काळात मिळेलच…
तथापी शिंदे सरकारला शुभेच्छा प्रदान करतांना, ‘राज्यातील काँग्रेस पक्ष’ विधायक भूमिकेद्वारे आदर्श विरोधी पक्ष कसा असावा, याचे ऊदाहरण प्रस्थापित करेल असेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संपुर्ण शिवसेना हायजॅक’ करण्याचा भाजपाचा प्रयत्न-काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
Date:

