ठाण्यात भाजपचं आंदोलन,प्रविण दरेकर यांना अटक

Date:

मुंबई, दि. २६ जून – महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आणि ओबीसी राजकीय आरक्षण संरक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात भाजपच्यावतीने १ हजार ठिकाणी एकत्र आंदोलन करण्यात आले. मविआ सरकारने आम्हाला अटक केली किंवा आंदोलन करण्यापासून रोखले तरी देखील आमचा हा लढा सुरूचं राहील. जोपर्यंत ओबीसी समाजाचं सन्मानाचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.


ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राज्यभर भाजपने चक्का जाम व जेलभरो आंदोलन केले. ठाणे येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाणे येथे पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झाली. यावेळी भाजपाच्या आंदोलकांना व विरोधी पक्ष नेते दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दरेकर म्हणाले, सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला तात्काळ स्थगिती मिळविली नाही तर सरकारला ओबीसी समाजाच्या संतापाला सामोरे जावे लागेल. तसेच भाजपसुद्धा ओबीसीच्या राजकीय हक्कासाठी व न्यायासाठी टोकाचं पाऊल उचलेल असा इशारा दरेकर यांनी दिला.
काँग्रेस पक्षाच्यावतीने केंद्रातील भाजप सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहिर केले त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, महाराष्ट्रात कॉँग्रेसचे स्वबळ किती आहे ते कॅमेरा पाठवून बघावे, आंदोलन करायला दम आणि ताकद लागते. केवळ आंदोलन करत आहोत असे वक्तव्य करून होत नसतं. आज रस्त्यावर ओबीसीचे राजकीय आरक्षण संरक्षण करण्यासाठी १ हजार ठिकाणी भाजपचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील भाजपाच्या आजच्या चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून भाजपची राजकीय ताकद बघावी असा टोलाही दरेकर यांनी कॉँग्रेसला लगावला आहे. यावेळी आंदोलनात आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, संजय वाघुले, नारायण पवार, संजय लेले, डॉ. राजेश मढवी, प्रतिभा मढवी इत्यादि उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रज्ञा सातव यांचा राजीनामा दबावाखाली?:विरोधकांचा विधान परिषदेमध्ये गदारोळ

मुंबई-काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार प्रज्ञा सातव...

गर्भाशय कॅन्सरशी लढा; 14 वर्षांच्या मुलींना देणार लस:देशभरात मोफत मिळणार लस, जोखीम 85 % घटेल

नवी दिल्ली-केंद्र सरकार या महिन्याच्या अखेरीस देशभरात १४ वर्षांच्या...

प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयनिहाय आपत्ती  व्यवस्थानाची टीम करा

कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’ मार्फत प्रशिक्षण द्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सूचना आपत्ती...

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...