कल्याणीनगरमधील भाजप कार्यकर्त्यांची ‘आक्रोश फेरी’ ; प्रतिकात्मक ‘देशद्रोही’ पुतळ्याचे दहन
पुणे :
देशातील वाढत्या देश विघातक विचारांच्या निषेधार्थ कल्याणीनगरमधील भाजप कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी ‘आक्रोश फेरी’चे आयोजन केले होते. कल्याणीनगरमधील भाजपच्या नेत्या उषा बाजपेयी (‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या प्रदेश सहसमन्वयक) यांच्या नेतृत्वाखाली कुमार सिटी परिसर, कल्याणीनगर येथे ही फेरी सेरिब्रम आय. टी. पार्क, एचएसबीसी बँक, सायबेज, नगरवाला स्कूल, कल्याणी बंगला गणपती मंदीर या मार्गे काढण्यात आली.
गणपती मंदीर येथे फेरीची सांगता झाली आणि ‘आक्रोश फेरी’मध्ये ‘देशद्रोही’ या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
या फेरीमध्ये भाजपा सदस्य उषा बाजपेयी, मुकुंद वर्मा, माजी आमदार रमेश सेठ (मुंबई), विक्रांत आर्या, जयंत मोहिते आदी सहभागी झाले होते.
फेरीदरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी ‘शहीदों का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’, ‘भारत माता की जय’, ‘देशद्रोही मुर्दाबाद’ या घोषणा दिल्या.