पुणे-समर्थ बूथ अभियान अंतर्गत प्रभाग क्र. २८ ब मधील नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या माध्यमातून पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक व पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बूथ रचना, समिती याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात आयोजक श्रीनाथ भिमाले, श्रीपाद ढेकणे,कुलदीप सावलळेकर,जितेंद्र पोळेकर, विश्वास ननावरे, गणेश शेरला, शैलेश देशपांडे, राजू कदम, देशपांडे काका, यांच्यासह प्रभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


