घटनेच्या चौकटीत जम्मू-काश्मिरचा प्रश्न सोडविला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील

Date:

  • कलम ३७०: नेहरुंपासून मोदींपर्यंत ‘ पुस्तकाचे प्रकाशन.

पुणे : ‘जम्मू-काश्मिरचा प्रश्न खूप गुंतागुंतीचा आणि जटील असल्याने कधीही सुटू शकणारा नाही असे सोयीचे राजकीय चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राजकीय मुत्सद्दीगिरी दाखवत हा प्रश्न घटनेने आखून दिलेल्या चौकटीत सोडविला’ असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

‘कलम ३७० : नेहरूंपासून मोदींपर्यंत’ या सोमेश कोलगे यांनी लिहिलेल्या, ‘विराट’ प्रकाशनच्या पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात करण्यात आले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, लेखक सोमेश कोलगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील पुढे म्हणाले, ‘कलम ३७० हटवून जम्मू-काश्मिरात भारतीय संविधान पूर्णतः लागू करण्याचा निर्णय सहजासहजी झाला नाही. संघर्षाचा, आंदोलनांचा आणि टोकाच्या वादविवादाचा मोठा इतिहास आहे. कलम ३७० आम्ही पुन्हा लागू करू किंवा ३७० विषयीचा निर्णय प्रक्रियेचे पालन करून झालेला नाही,अशा वल्गना करणाऱ्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.’

भांडारी म्हणाले, ‘मराठीमध्ये आपले संविधान, संविधानिक इतिहास, घडामोडी अशा विषयांवर फारसे लेखन होत नाही. ३७० कलमावर युवा लेखक कोलगे यांनी केलेली विषयाची मांडणी अभ्यासपूर्ण आहे. युवा लेखकांनी संविधानाचा सखोल अभ्यास करून विपुल लेखन करण्याची गरज आहे.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...