मुंबई, दि. १८- महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला दमदार यश मिळाले असून कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही भाजप पुन्हा एकदा नंबर वन चा पक्ष ठरला आहे. गेली अनेक वर्षे कोकण हा आमचाच बालेकिल्ला असल्याचा सातत्याने दावा करणा-या शिवसेनेला या निकालामुळे चोख प्रत्युत्तर मिळाले असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच ग्रामपंचायमधील ५७४ जागांपैकी भाजपाने १९० जागांवर विजयी मिळवित आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. पंचायत ते पार्लमेंट पर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये यापुढेही भाजप विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहिल. तसेच कोकणामध्ये भाजपा आता अतिशय प्रभावीपणे संघटनात्मक व राजकीयदृष्टया पुढे जाण्यास सुरुवात झाली आहे असेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचयातीच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे हे दमदार यश प्राप्त झाले आहे, असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणात भाजपच नंबर १ चा पक्ष -सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रविंद्र चव्हाण
Date:

