पुणे : सहा वर्षीय वैशाली यादवची ‘मन की बात’ ऐकून तिच्या हृदयविकारावर पंतप्रधानांनी उपचारासाठी मदत केल्यानंतर, या कुटुंबाला ‘अच्छे दिन’ आले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
वैशालीचे पालक असणारे तिचे काका प्रतापसिंह यादव यादव हे बेरोजगार आहेत. त्यांना वर्ल्डवाईड ऑईलफिल्ड मशिन प्रायव्हेट लिमिटेडने ‘मेक इन इंडिया’ उपक‘माअंतर्गत नियुक्तीचे पत्र दिले आहे. कंपनीचे ह्यूमन रीसोर्स आणि ऍडमिन विभागाचे प्रमुख रवी भूषण यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना नोकरीत कायम केले जाईल.
हडपसर येथे राहाणार्या वैशालीला जन्मजात हृदयरोग जडला आहे. त्यामुळे तिला ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता. उपचारांचा खर्च परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.
त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयातील सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांना पत्र पाठवून वैद्यकीय मदतीच्या सूचना दिल्या. त्यानंतर तिच्यावर रूबी हॉलमध्ये शस्त्रकि‘या करण्यात आली. याचे वृत्त प्रसारमाध्यमातून सर्वदूर पसरले आणि वैशालीच्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला.
पुणे शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष योगेश गोगावले यांनी कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत केली. आज त्यांनी वैशालीला आवश्यक शिक्षण साहित्य दिले. माजी नगरसेवक उदय जोशी, गिरीश खत्री यावेळी उपस्थित होते. यावेळी भूषण यांनी तिच्या काकाला नियुक्तीचे पत्र दिले.
भूषण म्हणाले, ‘वैशालीचे वडील व काका बेरोजगार आहेत. शिक्षण कमी असल्याने त्यांना रोजगार देणे शक्य नव्हते. भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी कौशल्य विकासातून नोकरी देण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांचा कल लक्षात घेऊन नियुक्ती पत्र दिले.’
गोगावले म्हणाले, ‘वैशालीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येणार आहे. दोनच दिवसात शाळा सुरू होणार आहे. म्हणून तिला आवश्यक असणारे शालेय साहित्य आज तिच्याकडे सुपूर्द करण्यात आले.’
वैशाली यादव च्या कुटूंबाला ‘अच्छे दिन ‘
Date:




