सभागृहनेता बदलाचा विचार  ‘ विनाशकाले विपरीत बुद्धी ‘ ?

Date:

पुणे- आठच्या आठ आमदारांनी केलं तरी काय ? अशा प्रश्नांचा वारंवार होणारा भडीमार , तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या दुराग्रहांना व्यवस्थित सावरीत समन्वय राखण्याचे कौशल्य दाखविणे,आणि विरोधी पक्षांच्या तोफांचा चतुराईने यशस्वी सामना करण्याचे कसब दाखविलेल्या श्रीनाथ भिमाले यांना , त्यांच्या तोडीचा, या पदाचा कारभार योग्य पद्धतीने करेल असा  अन्य कोणी नगरसेवक सभागृहात नसताना त्यांना म्हणजे भिमाले यांना   सभागृहनेते पदावरून दूर करण्याचा विचार करणे  म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी ‘ ठरणार आहे असा महापालिका वर्तुळातील राजकीय समीक्षकांचा दावा आहे. दोन आमदारांचे ठीक आहे पण सभागृहनेता बदलाच्या विचाराबाबत ‘कान कोणी फुंकले ‘ असा प्रश्न उपस्थित होतो आहे . 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.  त्याची दखल घेवून  राज्यात गुरुवारी काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाच श्रीनाथ भिमाले यांना पुणे महापालिकेच्या सभागृहनेते पदाचा, तर सुनील कांबळे यांना स्थायी समिती अध्यक्षपदाचा आणि  सिद्धार्थ शिरोळे यांना पीएमपीएलच्या संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा देण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्याचे वृत्त आहे . 

स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि पीएमपीएल चे संचालक सिद्धार्थ शिरोळे आता आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा चंद्रकांत दादा यांनी मागणे सहाजिक आहे . पण भिमाले यांचा राजीनामा मागणे म्हणजे अनेकांना अचंबित करणारे वृत्त वाटते आहे . भिमाले हे सभागृहातील ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत . सर्व नगरसेवकांची त्यांनी व्यवस्थित मोट बांधली. ते पर्वती मतदार संघातून विधानसभेला इच्छुक होते . पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही . मात्र याबाबत त्यांनी मनात कोणतेही किल्मिष न बाळगता भाजपच्या माधुरी मिसाळ यांचे काम केले .आणि त्यातही त्यांनी यश मिळविले .पराभूत झालेल्या दोन्ही जागांवर तेथील तत्कालीन विद्यमान असेलेले आमदार ,उमेदवार कारणीभूत आहेत हे ठाऊक असताना भिमाले यांचा राजीनामा मागणे म्हणजे पक्ष नेतृत्व स्थानिक राजकारणातील जुन्याच खेळींना बळी पडत असल्याचा दावा होतो आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...