आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धतेचा आढावा

Date:

पुणे-

सध्या पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती श्री. पाटील यांच्यासमोर मांडली‌. तसेच, असोसिएशनकडून रुग्णांच्या नातेवाइकांचा त्रास कमी करण्यासाठी उपलब्ध साठ्यापैकी ना नफा ना तोटा तत्वावर रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले. यावर श्री‌. पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

या भेटीनंतर श्री. पाटील म्हणाले की, कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने ना नफा ना तोटा तत्वावर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. कारण, रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना दिवसभर फिरावं लागत आहे. त्यामुळे असोसिएशनने शक्य तितक्या रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी काही रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शनचे वाटप श्री‌. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अनिल बेलकर, रोहित कर्पे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागत आहे, त्यांचे अनुभव श्री. पाटील यांनी ऐकून घेऊन त्यांना धीर दिला. तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना किमान एक डोस मोफत देण्याची घोषणा श्री. पाटील यांनी यावेळी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...