बोलत नाही, करून दाखवतो हे आमच्या प्रचाराचे सूत्र-महापौर मुक्ता टिळक

Date:

पुणे-कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघातील कोरेगाव पार्क, ताडीवाला रोडवर आज सायंकाळच्या सत्रात प्रचार फेरी काढली.यावेळी माझ्यासोबत राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, नगरसेवक उमेश गायकवाड, हिमाली कांबळे, मंगला मंत्री, अतुल गायकवाड, पल्लवी जावळे, शिवसेनेचे अजय भोसले, आरपीआयचे अध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

-वाहतूक, पाणी, आरोग्य, नदी सुधारणा आदी महत्त्वाच्या विकासकामांना कॉंग्रे सच्या राज्यात राजकीय इच्छा शक्ती अभावाने खिळ बसली होती. केद्र, राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर या पायाभूत क्षेत्रात वेगाने विकासकामे सुरू झाली आहेत. म्हणूनच ‘बोलत नाही, करून दाखवतो’ हे महायुतीच्या प्रचाराचे आगामी काळातील सूत्र असेल अशी घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
महापौर टिळक म्हणाल्या, ‘कॉंग‘ेसच्या सत्ता काळात विकास आराखड्याला दहा वर्षे मंजुरी मिळू शकली नाही, शहरातील उपनगरांना जोडणारा एचसीएमटीआर प्रकल्प सुरू होण्यास तब्बल ३२ वर्षे प्रतिक्षा करावी लागली, मेट्रोचे काम सुरू होण्यास १३ वर्षे लागली, बसेसची खरेदी अभावानेच झाली, समान पाणीपुरवठा योजना लालफितीत अडकली, मुळा-मुठा नदीची गटारगंगा झाली. कॉंग्रेस  आघाडीच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराला दैनावस्था प्राप्त झाली होती.’
महापौर टिळक पुढे म्हणाल्या, ‘भाजप सत्तेत आल्यानंतर विकास आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी मिळाली. यावर्षी प्रलंबित एचसीएमटीआर प्रकल्पाचे काम सुरू झाले. मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. सुमारे एक हजार बसेस खरेदीची प्रकि‘या सुरू झाली आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ६० साठवण टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जायका प्रकल्पाअंतर्गत मुळा-मुठा शुद्धीकरण व नदीकाठ सुधारणांच्या विकासकामांना प्रारंभ झाला आहे. म्हणजेच आम्ही केवळ बोलत नाही, तर करून दाखवतो हेच या विकासकामांतून निदर्शनास येते. हे प्रकल्प मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी बोलत नाही, करून दाखवतो हे आमच्या आगामी प्रचाराचे सूत्र राहणार आहे. प्रचार फेरी, जाहीर सभा, पथनाट्य, सोशल मीडिया या सर्व माध्यमातून आम्ही आक‘मक आणि सकारात्मक प्रचार करणार आहोत.’

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...