गिरीश बापट यांच्या प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण-शहराध्यक्ष योगेश गोगावले

Date:

पुणे- रविवारच्या सुट्टीचा दिवस साधून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ १९४४ बूथपैकी बहुतांश कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन परिचय पत्रकांचे वाटप केले. ‘एक दिवस बूथसाठी’ या अभियानाअंतर्गत उद्या संध्याकाळपर्यंत सर्व बूथमध्ये पत्रक वाटप पूर्ण होणार आहे. या अभियानाद्वारे महायुतीच्या प्रचाराची दुसरी फेरी  पूर्ण झाली असून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिंदे आणि आरपीआयचे प्रसिद्धी प्रमुख ऍड. मंदार जोशी यांची उपस्थिती होती.
श्री. गोगावले म्हणाले, ‘दुसर्‍या टप्प्यात सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये दुसरी प्रचार फेरी पूर्ण झाली. पथनाट्य, व्हिडिओ रथ, कोपरा सभांद्वारे मतदारसंघ ढवळून काढण्यात आला. महिला, युवक, अल्पसंख्यांक , भटक्या विमुक्त जमाती, वाल्मिकी समाज, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी आदी मेळाव्यांचे आयोजन केले होते. विविध समाजघटकांनी बापट यांना पाठिंबा जाहीर केला.’
श्री. गोगावले पुढे म्हणाले, ‘पुढील टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, पंकजा मुंडे, विनय सहस्रबुद्धे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. महायुतीचा जाहीरनामा येत्या बुधवारी जाहीर केला जाणार आहे. मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. १६ एप्रिलपासून मतदारांना घरोघरी जाऊन स्लिपांचे वाटप केले जाणार आहे.’
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा ‘नॅशनल लीडरशिप अवॉर्ड २०२६’ ने गौरव

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी २०२६: महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक...

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या कामाची महापौरांकडून पाहणी

पुणे- माणिकबाग, सिंहगड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज...

नदीपात्रातील कचऱ्याची आग कायम,परिसरात विषारी धुराचे मोठे लोट; श्वसनाचा त्रास झाल्याने विद्यार्थी रुग्णालयात;

पुणे:लोणी काळभोर परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला...

अजित पवारांच्या विमान अपघातावर पतंगबाजी नको:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

सुनेत्रांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आमचा नव्हे राष्ट्रवादीचा होता विलिनीकरणाच्या सीक्रेटची...