मेट्रोमुळे शहराच्या शाश्‍वत व गतीमान विकासाला गती मिळेल-गिरीश बापट 

Date:

पुणे-सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शहरभर मेट्रोचे जाळे विणण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून शहराच्या शाश्‍वत व गतीमान विकासासाठी गती मिळेल असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या व्यापारी मेळाव्यात बापट बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे, विशाल धनवडे, ऍड. मंदार जोशी, सुरेश धर्मावत, पल्लवी जावळे, उमेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बापट म्हणाले, ‘विकासकामे वेगाने मार्गी लागावीत यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती कॉंग‘ेस पक्षात नाही. त्यामुळे मेट्रोसारखा महत्त्वाचा प्रकल्प पंधराहून अधिक वर्षे रखडला. केंद्र, राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. रामवाडी ते शिवसृष्टी, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिंकाबरोबर शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे.’ 
बापट पुढे म्हणाले, ‘मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) सादर केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटरचे लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाव्यतिरिक्त  आठ मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरभर मेट्रोचे जाळे विणले जाईल.’
मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रोमुळे ६१ हजारांहून अधिक खासगी वाहने रस्त्यावर येण्याची कमी होऊन वार्षिंक १.२२ लाख टन इंधनाची बचत होईल. त्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणेकरांना गतीमान व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मेट्रो प्रकल्प पर्यावरणस्नेही आहे. मेट्रो स्थानकांचाही बहुविध वाहतूक केंद्र म्हणून विकास केला जाणार आहे. व्यापारी संकुलांमुळे व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे पुणे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, विकासकामांना गती मिळणार आहे.
 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जातीयवादाच्या भस्मासुराच्या होळीत ट्रम्प च्या चित्राचीही पुण्यात होळी

पुणे : वंदे मातरम् संघटना संयुक्त युवा फिनिक्स सोसायटीच्या...

युद्धास कारण अन शिया सुन्नी संघर्ष

इराणमध्ये अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या मुसलमानांनी तेथील...

युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या पुण्यातील १२३ नागरिकांबाबत माहिती प्राप्त

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज-जिल्हाधिकारी...

कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचा शुभारंभ संपन्न

पुणे- दिनांक २ मार्च २०२६ रोजी महापौर मंजुषा...