-भिमालेंकडून किराना साहित्याचे वाटप सुरु
पुणे- वार्डस्तरीय,आमदार ,खासदार निधी अशा माध्यमातून भाजपकडून पुण्यात कोरोनाशी लढ्यासाठी भाजपकडून १६ कोटी १४ लाखाचा निधी महापालिका आयुक्तांना उपलब्ध करून दिला असून या शिवाय प्रत्येक नगरसेवकाच्या पातळीवर गरजूंना घराबाहेर पडायची वेळ येवू नये ,कोणी उपाशी राहू नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे कुठे मोफत तर कुठे सवलतीच्या दरात पण थेट दारात करण्यात येईल असे येथे माजी आमदार आणि शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने आजपासून गरजूंना किराना साहित्याचे मोफत वाटप करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यभिमाले यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या या उपक्रमाचे यावेळी शहर भाजपच्या वतीने त्यांनी कौतुक केले. नगरसेविका राजश्री शिळीमकर ,प्रवीण चोरबोले , पीआय सर्जेराव बाबर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महापालिकेची आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी १६ कोटी १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि खासदार गिरीश बापट यांनी खासदार निधीतून अनुक‘मे एक कोटी आणि ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाख रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे महापालिकेतील भाजपच्या ९७ नगरसेवकांनी वॉर्डस्तरीयतून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि स यादीतून प्रत्येकी १० लाख रुपये असे ११ कोटी १४ लाख रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये अद्ययावत करणे, उपचारासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणांची खरेदी करणे आणि औषधोपचारासाठी निधीचा विनियोग करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे अनेक गरीब कुटुंबांची परवड होत आहे. शहरातील अशा एक लाख आर्थिक दुर्बल गटातील कुटुंबांना किराणा मालाची खरेदी करता यावी यासाठी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकार्यांच्या माध्यमांतून सोमवारपासून कुपन्स वितरीत करण्यात येणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून पुणे शहरात आरोग्य यंत्रणेत काम करणारे डॉक्टर, सेवक, स्वच्छता कर्मचारी, पोलीस आणि पत्रकारांसाठी २० हजार मास्क वितरीत करण्यात आले आहेत.

नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे ,आणि कोणी परिस्थिती अभावी उपाशी राहू नये या संकल्पनेतून शासकीय नियमांच्या अधीन राहून , आपणा काही समाजाचे देणे लागतो या भावनेतून हा कार्यक्रम राब्वियात येत असल्याचे यावेळी माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.