दिल्लीत शपथविधी सोहळ्या निमित्त पुण्यात मोदी भक्तांचा जल्लोष

Date:

पुणे-नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी प्रित्यर्थ आज पुण्यातील स्वातंत्र्य वीर सावरकर स्मारक येथे मोदी  भक्तांनी भांगड़ा नृत्य करत जल्लोषाने आनंद व्यक्त केला.

सावरकर स्मारक.कर्वे रस्ता.येथे झालेल्या जल्लोषात शीख बांधवांनी भांगडा नृत्य सादर करत बार बार मोदी सरकार ; फिर एक बार मोदी सरकार च्या जयघोषात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शरबत वाटप करुन या आनंदात सहभागी करुन घेतले….यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक आदित्य माळवे,वृक्ष संवर्धन समिती सदस्य संदीप काळे,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,दत्तात्रेय खाडे , यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले आणि शिपिंग कारपोरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना योगेश गोगावले म्हणाले ” नरेंद्र मोदींच्या ५ वर्षांच्या कारकिर्दीस देशवासीयांनी पसंती दिली व त्यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमत दिले. ” आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी सबका साथ सबका विकास या घोषणेबरोबरच नरेंद्रभाईनी दिलेल्या सबका विश्वास या घोषणेला प्रत्यक्षात उतरवायचे आहे आणि नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील विकासपर्व गाठायचे आहे.प्रदीप रावत यांनी सांगितले ” की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार भाजप करते त्यांच्या स्मारक स्थळी आज नरेंद्र मोदींच्या शपथविधी निमित्त जल्लोष केला जात आहे हा अपूर्व संयोग असून ज्या प्रकारचे राजकारण स्वातंत्र्यानंतर अपेक्षित होते ते सुशासन नरेंद्र मोदींनी देशाला दिले असे ही ते म्हणाले.ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज ही उपेक्षा सहन करावी लागते त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन होत असल्याने या स्मारकाच्या ठिकाणी हा जल्लोष आयोजित केल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.कार्यक्रमाचे संयोजन चरणजीतसिंग सहानी,संदीप खर्डेकर दिलीप उंबरकर  सतीश गायकवाड,शरणजीतसिंग बग्गा,यशराज शेट्टीयांनी केले.यावेळी ढोल च्या तााशा च्या निनादात सर्व नमोभक्तांनी तल्लीन होवून नृत्य केले व जयघोष केला..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...