पुणे-
पुण्यात भाजपचा जल्लोष पुणे- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने भाजपने शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु होताच पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाजीराव रस्त्यावरील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष केला .यावेळी महापौरांनी ढोल बडविला तर हेडमास्तर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी तशा वाजविला. हेमंत रासने ,अशोक येनपुरे यांच्यासह अनेक नगरसेवक नगरसेविकांनी नाचून जल्लोष केला .
भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले –
आजचा भाजपचा विजय संपूर्ण देशाला संदेश देणारा आहे. राजकीय परिपक्वता, प्रगल्भता, विकासाचे राजकारण, विकासाप्रती असलेली सरकारची प्रामाणिक भावना आणि नरेंद्र मोदींचे प्रामाणिक नेतृत्व यामुळे मतदरांनी भाजपला मते दिली. तर विरोधातील अत्यंत बालिश, कुठल्याही प्रकारची संघटनात्मक बैठक नसलेला, राजकीय परिपक्वता नसलेला इतर पक्षाचा विचार आणि जनतेची आजवर केलेली दिशाभूल यामुळेच जनतेने काँग्रेसला हा धडा शिकवला आहे. त्यामुळे कर्नाटकचा विजय हा संपूर्ण देशाच्या जनतेचा कौल आहे.
– खा. अनिल शिरोळे
कर्नाटकच्या जागरूक,सक्रीय जनतेने काँग्रेसला नाकारलंय आणि ४ वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकर्तृवावर, आणि भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवलाय. येणाऱ्या मध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थान च्या निवडणूकीत आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला निश्चित विजय मिळेल आणि श्रेष्ठ ,समर्थ, विकसित भारताचा संकल्प २०२२ पर्यंत सिध्दिस जाईल याचा विश्वास वाटतो.
महापौर मुक्ता टिळक –

कर्नाटक राज्यात मिळालेल्या विजयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्य जनतेने टाकलेला विश्वास दर्शवतो. नरेंद्र मोदींनी गेली चार वर्षे फक्त सर्वासामन्य जनतेच्या हितासाठी काम केले आहे हे जनतेला आता कळायला लागले आहे. यापुढील काळातही देशात भाजपचे वारे जोरात वाहायला लागेल आणि 2019 मध्येही भाजपचा विजय होईल.
विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तरी भारतीय जनता पक्षाने कर्नाटकमध्येही विजयचा झेंडा रोवला आहे. नरेद्र मोदींची लोकप्रियता, विश्वासाहर्ता, अमित शहा यांचे संघटन कौशल्य आणि शेवटच्या कार्यकर्त्याने केलेले काम यामुळे आम्हाला कर्नाटकमध्ये विजय संपादन करता आला आहे.