पुणे- जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून तळागाळातल्या ,आणि सर्व जनतेच्या ,लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल भाजपा कडून निश्चित घेण्यात येते असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले .
राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सुरु केलेल्या २४ तास जनसेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते . निंबाळकर तालीम चौकात हे २४ तास जनसेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे .. पहा याचा हा अल्पसा व्हिडीओ वृत्तांत …