खासदार काकडेंतर्फे ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ स्वच्छता मोहिमेचे आयोजन!
पुणे रेल्वे स्टेशन ते मालधक्का चौक व ससूनमध्ये केली स्वच्छता
राज्यमंत्री कांबळे, महापौर टिळक, खासदार शिरोळे, आमदार कुलकर्णी व काळे, 40 नगरसेवक व हजारो नागरिकांची उपस्थिती
पुणे, दि. 2 ऑक्टोबर :महापालिकेतील पदाधिकारी आणि खासदार काकडे यांचे काही तरी आहे वाकडे .. असे वाटण्याजोगी परिस्थिती या पूर्वी दिसून आलेली आहे . पण शेवटी दसऱ्याचा नाही तर महात्मा गांधी जयंतीचा च करिष्मा दिसला . खासदार संजय काकडे यांच्या समवेत चक्क महापौर ,सभागृहनेते आणि खासदार शिरोळे ,यांच्यासह आमदार मेधा कुलकर्णी,विजय काळे, आणि राज्यमंत्री कांबळे व सुमारे ४० नगरसेवक स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एकत्र दिसले . ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा नारा देत भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी व विजय काळे यांच्यासह 40 नगरसेवक व हजारो कार्यकर्त्यांनी आज पुणे रेल्वे स्टेशन ते मालधक्का हा रस्ता व ससून रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानानिमित्त आज महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी पुणे रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला खासदार संजय काकडे व खासदार अनिल शिरोळे यांनी हार घातला व स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. रेल्वे स्टेशन ते मालधक्का चौकापर्यंतचा रस्ता आणि त्यानंतर ससून रुग्णालयातील परिसराची स्वच्छता यावेळी करण्यात आली. खासदार काकडे, खासदार शिरोळे, महापौर टिळक, आमदार कुलकर्णी, आमदार काळे आणि इतर मान्यवरांनी प्रत्यक्षात हातात झाडू घेऊन परिसरातील कचरा गोळा केला. राज्यमंत्री दिलीप कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, 40 नगरसेवक व सुमारे 3 हजार नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले आहे. स्वच्छता ही आरोग्याशी निगडीत आहे. आपला परिसर स्वच्छ असेल तर आपले आरोग्यही सुदृढ राहणार आहे. म्हणून देश स्वच्छ झाला तर, संपूर्ण देशाचे आरोग्य सुदृढ होईल. पंतप्रधान मोदी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी सारा देश एकवटला आहे. ही आनंदाची बाब आहे, असे सांगून पुण्याचा कचरा प्रश्नही लवकरच सुटेल, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.
खासदार संजय काकडे यांनी स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविला आणि त्याला हजारो नागरिकांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. हा अत्यंत चांगला उपक्रम असून पुणे शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रभागी राहील व पुण्याचा कचरा प्रश्नही सुटेल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
स्वच्छ भारत झाला तर, सुदृढ भारत बनेल. हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न वास्तवात येईल. खासदार काकडे यांनी आयोजिलेल्या उपक्रमाला हजारोंच्या संख्येने लोक आले. त्यामुळे स्वच्छ भारताचे स्वप्न नक्कीच वास्तवात येईल असे वाटते, असे खासदार अनिल शिरोळे म्हणाले.
स्वच्छ भारत अभियानात नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, प्रकाश ढोरे, शंकर पवार, बापु कर्णे गुरुजी, राहुल भंडारे, दिनेश धाडवे, धीरज घाटे, विष्णू हरिहर, मनीषा लडकत, मंगला मंत्री, कालिंदा पुंडे, राजाभाऊ लायगुडे, अमोल बालवडकर, किरण दगडे पाटील, विजय शेवाळे, दिलीप वेडेपाटील, प्रसन्न जगताप, जोत्स्ना एकबोटे, सरस्वती शेडगे, तुषार पाटील, हरिभाऊ चरवड, राजश्री काळे, नीता दांगट, राजश्री नवले, परशुराम वाडेकर, भरत वैरागे, हरिश परदेशी, ज्योती कळमकर, उमेश गायकवाड, अशोक लोखंडे, सुशील मेंगडे, चंद्रकांत चौधरी, रायबा भोसले, संतोष आरडे, अजय सावंत, धनराज घोगरे, सुनील कांबळे आदी सहभागी झाले होते.