पुणे :
पुणे भारतीय जनता पक्षाच्या ‘ ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘ प्रचार वाहनाचे उदघाटन भाजप महामंत्री अनिल जैन (दिल्ली) , पालकमंत्री गिरीश बापट, प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी, महापौर मुक्ता टिळक, शहराध्यक्ष योगेश गोगावले, भाजप पालिका गट नेते श्रीनाथ भिमाले, मुकुंद वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाले. घोले रोड येथे हा कार्यक्रम झाला.
पुणे भारतीय जनता पक्षाच्या ‘ ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ” संयोजक उषा वाजपेयी यांनी हे प्रचार वाहन तयार केले आहे . ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘ अभियान संयोजक उषा वाजपेयी आणि कार्यकर्ते यांनी महापौर मुक्ता टिळक यांचा सत्कार केला.
हे प्रचार वाहन सर्वत्र अभियानाचा संदेश देण्यासाठी जनजागृतीसाठी फिरणार आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला पूर्ण सहकार्य केले जाईल’, असे आश्वासन यावेळी महापौर मुक्ता टिळक आणि भाजप पालिका गट नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिले .
आमदार जगदीश मुळीक ,नगरसेवक योगेश मुळीक, सुनीता गलांडे, शीतल शिंदे, संदीप जऱ्हाड यावेळी उपस्थित होते.

