मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशासोबतच आगामी विधानसभा निवडणीत इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाची 5 वर्षांपासून प्रतीक्षा होती असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी हर्षवर्धन बोलतांना म्हणाले की, कार्यकर्त्यांना अद्याप वाटत नाही की मी भाजपामध्ये आलो. हा अन्यायग्रस्त समाज आहे पण या समाजाला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ द्यावे. आम्ही एका विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत, पण आता आम्ही विकासाच्या मुद्यांवर इथे आलो आहोत. मी कुठलीही अट घालून पक्षात आलेलो नाही. मुख्यमंत्र्यांचा हसरा चेहरा आहे, आता त्यांच्याबरोबर हर्षवर्धन आलेला आहे. मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजार नाही. आमच्या मतमतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडवा असेही ते म्हणाले.

