(प्राब न्यूज )-
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे कार्यक्रम-
21 जुलै 2019 – प्रदेश विस्तारित कार्यसमिती
25 जुलै ते 10 ऑगस्ट 2019 – जिल्हयासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक
9 ऑगस्ट 2019 – सदस्यता अभियान ड्राइव्ह
1 जुलै ते 15 ऑगस्ट – नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा)
15 जुलै ते 15 ऑगस्ट – पक्ष विस्तार योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत)
10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट – विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन
1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट – शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन) 16 ऑगस्ट – रक्षाबंधन कार्यक्रम
1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट – महाजनादेश यात्रा
15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर – विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम
16 ऑगस्ट – स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)
152 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७ सप्टेंबरला जल्लोष करणार
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारताचे ‘चांद्रयान-२’ हे महत्त्वाकांक्षी यान यशस्वीरीत्या ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे या दिवशी अभिमानास्पद कामगिरीचा देशभर जल्लोष करून महाराष्ट्रात व हरियानात भाजप सरकारचे मतदारांना प्रभावित करण्याचे नियोजन देखील असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा ७ सप्टेंबरनंतर होण्याची शक्यात देखील वर्तवली जात आहे.
सप्टेंबर महिन्याच्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी अंगारकी चतुर्थीदिनी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेण्यात येऊ शकते. सर्वसाधारण 20 ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान व दिवाळी पूर्वी म्हणजे 23 अथवा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होऊ शकेल. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ मध्ये महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर २०१४ रोजी घेण्यात आलेल्या होत्या तर मतमोजणी 19 ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती.निवडणूक कार्यक्रम १२ सप्टेंबर २०१४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या होत्या. महाराष्ट्रासह हरियाणामधील निवडणुका एकाच वेळी जाहीर करण्यात आलेल्या होत्या महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबर २०१४ रोजी संपणार होती तत्पुर्वी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. संपूर्ण प्रक्रिया २२ ऑक्टोबर २०१४ रोजी पूर्ण करण्यात आलेली होती. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता देखील गेल्या वेळी प्रमाणे ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येतील कारण महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपणार आहे. तत्पुर्वी निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगास क्रमप्राप्त आहे. गेल्या निवडणुकांच्या तारखांच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सव सांगता १२ सप्टेंबर २०१९ रोजी संपणार आहे. या कालावधीत सुरक्षेवर मोठ्याप्रमाणात ताण यंत्रणांवर असतो त्यामुळे गणेशोत्सवानंतर निवडणुका जाहीर होतील. तर २५ ऑक्टोबर २०१९ पासून दीपावली सण सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच मतदान घेण्यावर आयोगाची मदार असेल. सर्वसाधारण सप्टेंबर महिन्याच्या १७ सप्टेंबर २०१९ रोजी अंगारकी चतुर्थीदिनी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ करीता निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. तर २५ सप्टेंबर २०१९ रोजी अधिसूचना काढण्यात येऊ शकते तर नामनिर्देशनपत्र घटस्थापना व नवरात्री कालावधीत भरण्याची मुदत असणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेण्यात येऊ शकते. सर्वसाधारण 20 ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान व दिवाळी पूर्वी म्हणजे 23 अथवा २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणी होऊ शकेल. ऐनदिवाळीत अथवा नंतर नव्या मंत्रिमंडळाची शपथ ग्रहण होऊ शकते.
ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेचा भर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूकपूर्व प्रचार दौऱ्यांचे आयोजन केले जात असून ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप व शिवसेनेचा जास्त भर आहे. निवडणुकीत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने केंद्रित प्रचारावर व निवडणूक खर्चावर मर्यादा येतात. अनेक विभागांच्या परवानगी घ्यावी लागते. राज्य व केद्र स्तरावरील नेत्यांच्या सभांच्या आयोजनात कार्यकर्त्यांचा वेळ खूप वाया जातो. प्रत्यक्ष मतदारांना भेटणे व प्रचारसाहित्य पोहोचवणे जिकरीचे होते म्हणून ऐननिवडणुकीतील खर्चाला लगाम लावण्यासाठी निवडणूकपूर्व प्रचारावर भाजप-सेनेने भर दिलेला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात उमेदवारांना खर्चाची २८ लाखांची मर्यादा असते. या खर्चात स्टार प्रचारक व राजकीय पक्षांचा प्रचार खर्च समावेश केला जात असल्याने प्रचारावर मर्यादा येतात. यावर मात करण्यासाठी भाजप व शिवसेनेने निवडणूकपूर्व प्रचार दौऱ्यांचे आयोजन केले आहे.
152 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा
आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांची तयारी अन २२० जागांवर लक्ष्य आणि प्रत्यक्ष 152 विधानसभा मतदारसंघातच प्रचार ही भाजपची रणनीती आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट संपूर्ण महिनाभर 30 जिल्हे व्याप्त महाजनादेश यात्रा काढून 25 दिवसात पूर्ण करून सुमारे 4 हजार 232 किलोमीटर अंतर कापून महाराष्ट्रातील 152 विधानसभा मतदारसंघात तब्बल 104 जाहीर सभा आणि 228 स्वागत सभा घेण्यात येणार आहेत तर 20 पत्रकार परिषदांमध्ये निवडणूकपूर्व प्रचारांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात ‘जनआशीर्वाद’ यात्रा नुकतीच काढली होती. या यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून राज्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू केली असून, ती जळगाव येथून सुरू झाली होती. आदित्य ठाकरे युवकांसोबतच शेतकऱ्यांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व जनतेच्या मनावर बिंबवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. ‘एलईडी’युक्त रथ या यात्रेत वापरला जाईल. यात फडणवीस सरकारने केलेल्या कामाची माहिती चलचित्रांद्वारे दिली जाईल. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दीड ते दोन महिन्यांत आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 1 ते 31 ऑगस्टपर्यंत महाजनादेश यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून राज्य सरकारने केलेल्या कामासोबत नवीन काही घोषणा करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर, नंदुरबार, अकोला, वाशीम व धुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करून महिनाभरात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. पाच जिल्ह्यांत निवडणुका असल्या तरी याचा परिणाम राज्यावर होईल. सरकारला धोरणात्मक निर्णय घेताना अवघड जाणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला फटका बसणार आहे. निवडणूक आयोगाकडून त्यांची यात्रा रोखली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.