Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही

Date:

पुणे-.आम्ही जिवाचं रान करून आज हा पक्ष आज जो झालेला आहे, तो आमच्या ताकदीनं, मेहनतीनं आणि आमचा खारीचा वाटा होता म्हणून झालेला आहे. यांचं काय योगदान आहे पक्षामध्ये? कितीवेळा हे तुरूंगात गेले? कितीवेळा दगड खाल्ले? आम्ही सायकलवर फिरलो. हमालासारखं फिरलो. कित्येक वर्ष तुरूंगात काढली. त्या हालअपेष्टांना पक्षामध्ये काही किंमत आहे की नाही? यांच्या सामाजिक समीकरणामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे बसत नव्हते का? जुन्या माणसांचा जेवढा जनाधार आज आहे, तेवढा नवीन माणसांचा जनाधार आहे का? वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीनं उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचं वाईट वाटतं. विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही,” असा घणाघाती हल्ला एकनाथ खडसे यांनी भाजपा राज्यातील नेत्यांवर केला

मी सदस्य असलेल्या राज्याच्या काेअर कमिटीने माझ्यासह पंकजा मुंडे आणि बावनकुळेंच्या नावाची विधान परिषदेसाठी शिफारस केली. परंतु, हे नाटक हाेते. सरळ फसवणूक असल्याची बाब आता लक्षात आली आहे. मला उमेदवारी नसल्याचा निराेप रात्री ११ वाजता मिळाला. परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता विधान भवनात हाेते. त्यांनी उमेदवारी अर्जाची तयारी, स्टॅम्प आणि एनआेसीची कागदपत्रे ही मार्च महिन्यात तयार केलेली हाेती.हे सर्व पूर्वनियाेजित असल्याचे स्पष्ट हाेत असल्याचे पक्षाने माझ्यासाेबत दगाफटका केला आहे. पक्षात वारंवार खच्चीकरण करणे, कट-कारस्थाने रचून मला पक्षाबाहेर ढकलण्याचे प्रयत्न पक्षातील काही लाेक जाणीवपूर्वक करीत आहेत. संघटनेत पूर्वीसारखी स्थिती नाही, पक्षात लाेकशाही उरलेली नाही. राज्यात पक्ष विशिष्ट मूठभर लाेकांच्या हाती एकवटला आहे, असा खळबळजनक आराेप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलामंगळवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले.

हे सर्व पूर्वनियाेजित असल्याचे स्पष्ट हाेत असल्याचे पक्षाने माझ्यासाेबत दगाफटका केला आहे. पक्षात वारंवार खच्चीकरण करणे, कट-कारस्थाने रचून मला पक्षाबाहेर ढकलण्याचे प्रयत्न पक्षातील काही लाेक जाणीवपूर्वक करीत आहेत. संघटनेत पूर्वीसारखी स्थिती नाही, पक्षात लाेकशाही उरलेली नाही. राज्यात पक्ष विशिष्ट मूठभर लाेकांच्या हाती एकवटला आहे, असा खळबळजनक आराेप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बेधडकपणे काही बाबी मांडल्या. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील स्वत: सुरक्षित मतदारसंघ देऊन निवडून आणणाऱ्या मेधा कुलकर्णींना संधी न मिळणे याेग्य नाही. विधान परिषदेसाठी पंकजा, मी आणि बावनकुळे यांची शिफारस केंद्रीय समितीकडे केली असल्याचा दावा चंद्रकांत पाटील करीत आहेत. मग पडळकरांसह अन्य चाैघांनी उमेदवारी अर्जासाठी लागणारे स्टॅम्पपेपर, विविध कार्यालयांच्या एनआेसी मार्च महिन्यातच कशा तयार करून ठेवल्या? ही निष्ठावंतांची शुद्ध फसवणूक आहे.

यासंदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांना फाेन केला हाेता. परंतु ते फाेनवर आलेच नाहीत. त्यांना आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी याबाबत विचारणा करणार आहे. मी विराेधी पक्षनेता असताना एकट्याच्या बळावर राज्यात सत्ता आणली हाेती. परंतु, त्यानंतर प्रमुख स्पर्धक असल्याने माझ्यावर नकाे ते आराेप करीत, षडयंत्र रचून मला बाहेर काढले. विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवारी मिळू दिली नाही. घरात वाद निर्माण करण्यासाठी मुलीला उमेदवारी दिली आणि तिचा पराभव करण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले. पक्षातील विराेधक अजूनही शांत नाहीत. मी पक्षाच्या बाहेर कसा जाईल, याचेच प्रयत्न ते करीत आहेत. या विधानसभा निवडणुकीत मूठभरांमुळे पक्षाची सत्ता गेली. विराेधी पक्षात बसावे लागले. असेच चालत राहिले तर १०५ चे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही, ही बाब मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहे.

दाेन वेळा आॅफर : विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फाॅर्म माझ्याकडे पडून हाेता. परंतु, मी ज्या पक्षात आयुष्याची ४० वर्षे वेचली ताे पक्ष न साेडण्याचा निर्णय घेतला. परवा विधान परिषदेसाठी पक्षाने डावलल्यानंतर काँग्रेसने सहाव्या जागेसाठी आॅफर दिली. पक्षात माझ्यावर अन्याय हाेत आहे, हे पाहत असलेल्या ६ ते ७ आमदारांनी फाेन करून मला मतदान करण्याची तयारी दर्शविली, परंतु तरीदेखील मी ही आॅफर नाकारली. मी पक्षात राहण्याचे प्रयत्न करीत असताना काही लाेक मला पक्षाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आराेप माजी मंत्री खडसेंनी केला

भाजपा सामाजिक समीकरणाच्या मांडणीविषयी बोलताना खडसे म्हणाले, “नव्यानं मांडणी करत असताना प्रामाणिकपणे मांडणी करावी. हा पक्ष ज्यावेळी पाहत होतो, त्यावेळी आणिबाणीचा कालखंड होता. जनता पार्टीचा कालखंड होता. त्यानंतर स्वतः मी कार्यरत होतो. तेव्हा या पक्षाची ओळख जी होती, ती मारवाडी, ब्राह्मण अशा पक्षाची ओळख होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, मी असेल, भाऊसाहेब फुंडकर असतील, या सर्वांनी मिळून या पक्षाला बहुजनांचा चेहरा दिला. तोपर्यंत बहुजनांचा चेहरा नव्हता. इथे कुणी यायला तयार नव्हतं. ओबीसींच्या संघटना तयार झाल्या. ओबीसींचे नेते तयार झाले. वर्षानुवर्षे ज्यांनी पक्षाला बळ दिलं. चेहरा बदलवला. तो चेहरा बदलवणं आता आम्हाला सांगता आहात का?,” असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...