पूरग्रस्तांना मदतीसाठी-भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिले पत्र

Date:

पुणे- नगरसेवकांच्या वार्ड स्तरीय निधीतून प्रत्येकी १ लाख आणि मानधनातून काही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने पाठवने गरजेचे आहे  असे निर्देश देणारे पत्र  आज भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिले आहे .त्यानुसार सोमवारी हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला पालकमंत्री चंद्रकातदादा  पाटील यांच्या हस्ते सोपविला जाणार आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातले आहे. लाखो लोकांवर हे महासंकट कोसळले असून हजारो संसार उघड्यावर आले आहेत. आपद्ग‘स्तांना मदत करण्यासाठी पुणे महापालिकेत भाजपचे सर्व नगरसेवक आपल्या वॉर्डस्तरीय रकमेतून प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी आणि एक महिन्याचे मानधन मु‘यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. या विषयाचे पत्र शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आज महापौर मुक्ता टिळक यांना दिले. हा निधी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मु‘यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने शहरातील संस्था, संघटनांची बैठक सोमवारी (१२ ऑगस्ट) दुपारी ४ वाजता पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, मार्केट यार्ड, बार कौन्सिल, शिक्षण संस्था, सहकारी क्षेत्रातील संस्था, वैद्यकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भाजप पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...