बळ बळ करणा-या महाविकास आघाडीला जनताच पळ काढायला लावेल -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Date:


लोणावळा, दि. १४ जुलै– कॉंग्रेसच्या नेत्यांना स्वबळाचे पडले आहे. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रातील शेतक-यांच्या हातात ताकद राहिलेली नाही, सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्या बाहुत बळ राहिले नाही. आज राज्यातील कामगार देशोधडीला लागलाय. त्या कामगारांच्या हातात बळ राहिलेले नाही. बेरोजारांना रोजगार मिळत नाही, पण अशा वेळी सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी आहे. परंतु जर अश्याच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसाल तर बळ बळ करता करता ही जनताच यांना पळ काढायला लावल्या शिवाय राहणार नाही असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोणावळा येथील शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी चिटणीस रमेश पाळेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच विविध वेतनवाढ करार स्वाक्षरी कार्यक्रम दरेकर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सर्वश्री विजय पाळेकर, बिंदरा गणतंत्रा, अॅड. राहुल पोळ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधतान दरेकर यांनी सांगितले की, कॉंग्रे़सचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील याच ठिकाणावरून स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य केले व महाविकास आघाडीतील अविश्वासाचे वातावरण व विसंवाद जनतेसमोर उघड झाला.
महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. शेतक-यांना वेळेत पीकविमा मिळात नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झालाय, बेरोजगार युवक कामाच्या प्रतीक्षेत आहे. तो युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे तुमच्या स्वबळाचं राज्यातील कामगार, शेतकरी, बेरोजगार यांना काही देणं-घेणं नाही. फक्त आमच्या हातात बळ कधी येणार? आमचं कुटुंब, आमचा संसार कधी बळकट होणार? याकडे महाराष्ट्राची जनता आशेने बघत आहे. पण या महाविकास आघाडी सरकारला त्याचं काही पडलेलं नाही”, अशी टिका दरेकर यांनी केली.
राज्यातील कोट्यवधी जनतेचा विकास करण्यापेक्षा महाविकास आघाडीमधील सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याची चिंता जास्त आहे. सत्ता कशी टिकून राहिल याची काळजी त्यांना जास्त आहे. आधी एकमेकांना शिव्या घालायच्या व दुस-या दिवशी पुन्हा एकत्र नांदायचे हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे समीकरण झाले आहे असेही दरकेर यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...