सरकारने आणखी निष्पाप स्वप्निलचे बळी घेऊ नये..

Date:


एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्या…
प्रविण दरेकर यांनी घेतली स्वप्निल लोणकर कुटुंबियांची भेट
पुणे दि. १४ जुलै- आज प्रत्येक कुटुंबात घुसमटलेला स्वप्निल आहे. त्यामुळे सरकारने एमपीएससीच्या उमेदवारांच्या नियुक्ता करेपर्यंत आणखी निष्पाप स्वप्निलचे बळी घेऊ नयेत. सरकारने तातडीने आयोगाचे सदस्य नियुक्त करुन एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या दिल्या पाहिजेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
एमपीएससीच्या गोंधळाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचललेल्या पुणे येथील विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. प्रविण दरेकर आज पुणे मधील फुरसुंगी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन त्यांना धीर दिला. लोणकर कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांच्या मुख्य परिक्षा झाल्या आहेत व जे मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात. त्यामुळे स्वप्निल सारख्या अन्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने सरकारने तातडीने पावले उचलावित, असेही त्यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...