महाविकास आघाडी सरकारचे धोरणच एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला कारणीभूत -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Date:


मुंबई, दि. २९ ऑक्टोबर – शेवगाव येथे दिलीप काकडे नावाच्या एसटी चालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. गेल्या वर्षभरात जवळपास २५ च्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. महाविकास आघाडी सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांबाबतचे धोरणच या आत्महत्यांना कारणीभूत आहे, असा स्पष्ट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केला.शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याच्या दुदैर्वी आत्महत्येच्या घटनेसंदर्भात दरेकर म्हणाले की, एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू असे सांगता आणि दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचारी वैफल्यातून आत्महत्या करतात. त्यामुळे आता तरी हे कठोर सरकार जागे होणार आहे की नाही. अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांच्या जर अशा आत्महत्या होत असतील तर महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा गंभीर असा इशाराही प्रविण दरेकर यांनी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...